
पुणे – भीमराव खांडे याने चंद्रकांत चव्हाण यांच्याकडून १०० रुपये उसने घेतले होते. चव्हाण यांनी सातत्याने उसने पैसे परत मागितल्याने १७ एप्रिल २०१५ या दिवशी त्यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात खांडे यांनी चव्हाण यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केली. सासवड रस्त्यावर वडकी गावातील गोदामाजवळ ही घटना घडली होती. या प्रकरणी रमेश चव्हाण यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. आरोपीला सत्र न्यायाधीश पी.पी. जाधव यांनी २० जानेवारीला ७ वर्षे सक्तमजुरी १० सहस्र रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
संपादकीय भूमिका :न्यायाची प्रक्रिया तत्परतेने झाल्यासच न्यायव्यवस्थेवरील विश्वास टिकून राहील ! |