तेजस एक्सप्रेसचे इंजिन बंद पडल्याने गाड्यांचा खोळंबा !

प्रतिकात्मक छायाचित्र

रत्नागिरी – कोकण रेल्वेमार्गावर धावणार्‍या सुपरफास्ट तेजस एक्सप्रेसचे इंजिन दुपारी १२ वाजता रत्नागिरी करबुडे या भागात अचानक बंद पडल्याने कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे वहातूक विस्कळीत झाली. १ घंट्याने या एक्सप्रेसला नवीन इंजिन जोडण्यात आल्यावर ती पूर्ववत् झाली. याचा परिणाम म्हणून कोकण रेल्वेमार्गावर धावणार्‍या काही गाड्या ठिकठिकाणी थांबवण्यात आल्या होत्या.