
यांगून (म्यानमार) – म्यानमारमध्ये अनेक महिन्यांपासून चालू असलेल्या गृहयुद्धाने भीषण वळण घेतले असून परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. राखीन राज्यात परिस्थिती सर्वांत गंभीर आहे. येथे म्यानमार सैन्य आणि वांशिक बंडखोर गट यांच्यामध्ये भयंकर युद्ध चालू आहे. सैनिकी संघर्षाचे रूपांतर आता धार्मिक तणावात झाले असून त्याचे परिणाम या परिसरात रहाणारे हिंदू आणि बौद्ध धर्मीय यांना भोगावे लागत आहेत. येथील बुथिडांगमध्ये हिंदू आणि बौद्ध यांची आतापर्यंत अनुमाने ५ सहस्र घरे जाळण्यात आली आहेत. येथील बहुतेक लोक आधीच क्षेत्र सोडून सुरक्षित ठिकाणी पळून गेले आहेत. त्यामुळे अनेक घरे रिकामी झाली; मात्र काही लोक आजही येथे रहात आहेत. ही घरे लुटण्यात आली आणि नंतर त्यांच्यासमोर जाळण्यात आली. ११ एप्रिल ते २१ एप्रिल काळात ही घरे जाळण्यात आली. बुथिदांग आता बंडखोर जातीय गट अरकान आर्मीच्या पूर्ण नियंत्रणाखाली आहे. या आर्मीमध्ये रोहिंग्या मुसलमानांचा समावेश आहे.
5,000 houses belonging to Buddhists and Hindus destroyed just 25 km from the #Bangladesh border.
📍Buthidaung, #Myanmar
While Hindus in India are not protected, will Hindus abroad ever be protected ?#HindusUnderAttack #SaveHindusGlobally pic.twitter.com/oCxquncsl4
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 21, 2024
संपादकीय भुमिकाभारतातील हिंदूंचे रक्षण केले जात नाही, तेथे विदेशातील हिंदूंचे रक्षण कधीतरी होईल का ? |
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य
ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील २० टक्के शुल्क मागे घेतले
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
पुणे येथील येरवडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अंजुम बागवान यांच्याकडून हिंदुद्वेषी आणि समाजविघातक कारवाया !
वर्ष २०२२ मध्ये युक्रेनवर अणूबाँब टाकण्यापासून पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना रोखले होते ! – Polish Minister
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !