घाटकोपर आणि कांजूरमार्ग येथे खून

घाटकोपर (मुंबई) – येथील पश्चिम भागात किरकोळ वादातून दोघांवर बांबू आणि धारदार शस्त्राने आक्रमण करण्यात आले. त्यात एकाचा मृत्यू झाला असून एक जण घायाळ झाला आहे. या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

कांजूरमार्ग (मुंबई) – येथील राजेश मनबीरसिंह सारवण या ४२ वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात टणक वस्तू मारून तिचा खून करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा नोंद केला. मृत व्यक्तीची ओळख पटली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.