१९ जानेवारीला पंचगंगा नदीवर अनंतकोटी ब्रह्मांडनायक स्वामींच्या नामस्मरण सोहळ्याचे आयोजन !

या सोहळ्यात ८ सहस्रांपेक्षा अधिक आबालवृद्ध सहभागी होतात. या सोहळ्यात पंचगंगा नदीची आरती आणि ‘श्री स्वामी समर्थ’ नामजप सोहळा होईल.

भ्रमणभाष चोरणार्‍या चोरट्याला कल्याण रेल्वेस्थानकात अटक

कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक नसल्यानेच अशा भुरट्या चोरांचे फावते !

Prayagraj Mahakumbh 2025 : महाकुंभपर्वात भगवान परशुरामाची ५१ फूट उंचीची मूर्ती उभारली !

भगवान परशुराम यांची मूर्ती मंदिरे आणि घरे यांमध्ये स्थापित करण्यासाठी १ लाख ८ सहस्र मूर्ती वितरित केल्या जात आहेत. भगवान परशुराम यांचे दिव्य अस्त्र परशु आणि १ लाख ८ सहस्र श्री परशुराम चालीसा यांचे वाटप केले जाईल.

देवस्थानांच्या शेतभूमी वाचवण्यासाठी सरकारने ‘अँटी लँड ग्रॅबिंग कायदा’ लागू करावा !

महाराष्ट्रातील देवस्थानांच्या शेतभूमी बर्‍याच प्रमाणात भूमाफियांद्वारे अनधिकृतपणे हडपल्या जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने ‘अँटी लँड ग्रॅबिंग कायदा’ (भूमी प्रतिबंध) कायदा आणण्यासाठी अध्यादेश काढावा, तसेच भूमी हडपणार्‍यांविरोधी …

मंदिरे हिंदु धर्मप्रचाराची केंद्रे होण्यासाठी मंदिर विश्वस्तांनी संघटितपणे प्रयत्न करावेत ! – श्रीकांत पिसोळकर, विदर्भ समन्वयक, महाराष्ट्र मंदिर महासंघ

मंदिरे ही हिंदु धर्माची आधारशीला आणि चैतन्याचा स्रोत आहेत. मंदिराचे रक्षण होऊन त्यांचे पावित्र्य टिकून राहण्यासाठी सर्व विश्वस्तांनी प्रयत्न केले पाहिजेत. या दृष्टीने महाराष्ट्र मंदिर महासंघ कार्यरत आहे.

‘स्टेट बँक ऑफ इंडिया’चे ए.टी.एम्. फोडून चोरी करणार्‍या धर्मांधांना अटक !

चंदगड तालुक्यातील कोवाड येथील ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’चे ए.टी.एम्. गॅस कटरच्या साहाय्याने फोडून १८ लाख ७७ सहस्र रुपयांची चोरी केल्याप्रकरणी चौघांना अटक झाली.

वाल्मिक कराड याची वाकडमधील (पुणे) सदनिका लाखबंद होणार !

बीडमधील पवनचक्की उद्योजकांकडे खंडणी मागणे आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मकोका) अटक असलेल्या वाल्मिक कराड याची वाकड येथील सदनिका लाखबंद (सील) करण्यात येणार आहे.

कुंभनगरीत सांस्कृतिक कार्यक्रमांचाही शुभारंभ !

कुंभनगरीतील सेक्टर १ येथील उत्तरप्रदेश सरकारच्या ‘गंगा पंडाल’ येथे त्यांच्या हस्ते सांस्कृतिक कार्यक्रमांचा शुभारंभ करण्यात आला.

महाकुंभपर्वात ‘संविधान कक्षा’चे उद्घाटन !

महाकुंभपर्वात उत्तरप्रदेश सरकारचे संसदीय कार्य मंत्री सुरेश खन्ना यांनी येथील त्रिवेणी संगमक्षेत्री उभारण्यात आलेल्या ‘संविधान कक्षा’चे उद्घाटन केले.

त्रिवेणी संगम क्षेत्रात येणार्‍या भाविकांची संख्या मोजण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर !

यावर्षी महाकुंभात किती भाविक आले आहेत ?, हे मोजण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.