विशाळगडाच्या मुक्तीसाठी २३ जानेवारीला धरणे आंदोलन !

आंदोलनाच्या प्रचारासाठी सिद्ध करण्यात आलेली इमेज पोस्ट

कोल्हापूर, २१ जानेवारी (वार्ता.) – विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवा, तेथील उरूस कायमस्वरूपी बंद करा, नरवीर बाजीप्रभु देशपांडे आणि नरवीर फुलाजी प्रभु देशपांडे यांच्या समाधीस्थळी शासनाच्या वतीने उचित स्मारक उभे करावे, या मागण्यांसाठी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने २३ जानेवारीला सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार श्री. नितीन शिंदे आणि हिंदू एकता आंदोलन कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई करणार आहेत.