कुंभमेळ्यात गौतम बुद्धांच्या २० फूट उंच पुतळ्याची उभारणी !

विश्‍व हिंदु परिषदेच्या माध्यमातून हिंदु-बौद्ध समन्वयाचा उपक्रम !

गौतम बुद्धांचा २० फूट उंच पुतळा

प्रयागराज, २१ जानेवारी (वार्ता.) – विश्‍व हिंदु परिषदेच्या माध्यमातून प्रथमच महाकुंभक्षेत्रात सेक्टर १८ मध्ये ‘हिमालय बौद्ध संस्कृती संरक्षण सभे’चे स्वतंत्र शिबीर उभारण्यात आले आहे. हिंदु आणि बौद्ध यांच्यातील समन्वयासाठी हा उपक्रम करण्यात येत आहे. गत कुंभमेळ्यापर्यंत विश्‍व हिंदु परिषदेच्या अंतर्गत हा उपक्रम केला जात होता. शिबिराच्या प्रवेशद्वारावर २० फूट उंचीचा गौतम बुद्ध यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. संत लामा जोधपाल यांच्या अध्यक्षतेखाली प्रतिदिन हिंदु आणि बौद्ध संत, तसेच भाविकांच्या उपस्थितीत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.