पिंगुळी येथील सुप्रसिद्ध प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज समाधी मंदिरात चोरी
तालुक्यातील पिंगुळी येथील प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज समाधी मंदिर आणि प.पू. समर्थ विनायक (अण्णा) राऊळ महाराज समाधी मंदिर या २ मंदिरांत ३ जानेवारीच्या मध्यरात्री चांदीच्या मूर्ती आणि दानपेटीतील रोख रक्कम, अशी एकूण ५ लाख ३८ सहस्र रुपयांच्या साहित्याची चोरी झाली आहे.