थोडक्यात महत्त्वाचे : बस चालू ठेवून चालक स्वच्छतागृहात !,मुंबईतील हवा प्रदूषणामुळे श्वसनाच्या आजारांत वाढ ! 

थोडक्यात महत्त्वाचे : बस चालू ठेवून चालक स्वच्छतागृहात !,मुंबईतील हवा प्रदूषणामुळे श्वसनाच्या आजारांत वाढ ! 

पुणे येथे पर्वती टेकडीवरील पेशव्यांच्या स्मारकाचे काम उत्तम दर्जाचे ! – चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री

पुढील टप्प्याचे कामही लवकरच चालू करण्यात येणार आहे. कामांची सूची सिद्ध करून ती सादर करण्याची सूचना ‘देवदेवेश्वर संस्थान’ आणि ‘स्मारक विकास समिती’ला केली आहे.

‘व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम ॲप’द्वारे एस्.टी.ची सद्य:स्थिती आणि ठिकाण समजणार !

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी ‘व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम ॲप’ आणले आहे. प्रवाशांना एस्.टी.चे थांबे, बस स्थानकात बस किती वाजता येणार, हे २४ घंटे अगोदर कळेल.

ग्रंथ व्यासंग जगण्याचे व्यवहार ज्ञान शिकवतो ! – राजीव खांडेकर, मुख्य संपादक, ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनी

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी नगरीमध्ये २४ व्या सातारा ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन झाले. त्या वेळी ते बोलत होते.

पुणे येथील कात्रज भागातून ४४ लाखांचे अमली पदार्थ जप्त, एकाला अटक !

कात्रज भागात अमली पदार्थ बाळगणार्‍या अरुण अरोरा याला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे.

शिवशाही बसमधून १ कोटी ६८ लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी !

रात्री १२ वाजता नाशिक-बोरिवली शिवशाही बसने ते प्रवास करत होते. रात्री १.३० वाजता बस एका उपाहारगृहाच्या ठिकाणी थांबली होती.

१६ जानेवारी या दिवशी ‘राष्ट्रीय स्टार्टअप’ दिनानिमित्त मुंबईत कार्यक्रम !

उद्योजक, युवा, इन्क्युबेटर्स यांना एकत्र आणून राज्यातील ‘स्टार्टअप इकोसिस्टिम’ मजबूत करण्यात हा कार्यक्रम महत्त्वाची भूमिका बजावेल.

श्रीरामपूर येथील कु. ओजस्वी मकवाना हिला ‘श्लोकाचार्य’ उपाधी प्रदान !

ती अहिल्यानगर जिल्ह्यात ‘श्लोकाचार्य’ उपाधी मिळवणारी एकमेव विद्यार्थिनी आहे. मागील वर्षी तिने लेव्हल ५ आणि ६ मध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता.

गृहनिर्माण संस्थांनी पर्यावरणीय पालटाविषयी जागृती करणे आवश्यक ! – सतीश मराठे, संचालक, ‘आर्.बी.आय.’

‘सहकार भारती संस्थे’च्या वतीने येथे आयोजित ‘संवाद सहकारा’चा या गृहनिर्माण सहकारी संस्थेसाठीच्या मार्गदर्शनपर कार्यक्रमात ते बोलत होते.

विशाळगड येथे होणार्‍या उरूसाला प्रशासनाने अनुमती नाकारली !

विशाळगड येथील अतिक्रमणाविषयी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती, तसेच हिंदुत्वनिष्ठ संघटना लढा देत असून पूर्ण अतिक्रमण निघाल्यावरच गड खुला करावा, अशी मागणी त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली होती.