Prayagraj Kumbh Parva 2025 : कुंभक्षेत्री सनातन धर्मशिक्षण आणि ग्रंथ प्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

सनातन संस्था आयोजित धर्मशिक्षण प्रदर्शनाला कुंभपर्वातील श्रद्धाळू, भाविक, संत-महंत यांच्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. असेच प्रदर्शन आमच्या भागात लावावे, असे संत आणि अनेक जिज्ञासू यांनी मागणी केली आहे.

Prayagraj Kumbh Parva 2025 : २७ जानेवारीला होणार्‍या धर्मसंसदेत ‘सनातन बोर्डा’ची ‘ब्लू प्रिंट’ निश्‍चित होणार !

या धर्मसंसदेत संपूर्ण सनातन मंडळाची संरचना आणि त्याचे उद्दिष्ट काय असेल ?, याविषयी विचारमंथन करण्यात येईल. धर्मसंसदेमध्ये पू. देवकीनंदन ठाकूर यांच्यासह धर्मगुरु, संत, महामंडलेश्‍वर आणि विचारवंत त्यांचे विचार मांडतील.

हिंदु धर्म आहे; म्हणून ‘डीप स्टेट’समोर भारताचे अस्तित्व टिकून आहे ! – अभिजित जोग, प्रसिद्ध लेखक

आज भारतात हिंदु धर्म आहे; म्हणूनच ‘डीपस्टेट’ समोर भारताचे अस्तित्व टिकून आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक श्री. अभिजित जोग यांनी केले.

कुंभमेळ्यात महिलांना कपडे पालटण्यासाठी असलेली आडोसा केंद्रे खालून दीड फूट उघडी !

महिलांना कपडे पालटतांना पूर्ण आडोसा द्यायला हवा, हे साधारण सूत्रही प्रशासनाच्या लक्षात आले नसल्याविषयी भाविकांकडून आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

अध्यात्म आणि वैदिक तत्त्वज्ञानातील तेजोमय दीपस्तंभ ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

अध्यात्म, वैदिक ज्ञान परंपरेचा निस्सीम साधक म्हणून गुरुवर्य डॉ. किसन महाराज साखरे यांची कार्यसाधना पुढील कित्येक पिढ्यांसाठी दीपस्तंभासारखी तेजोमय राहील, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवर्य डॉ. किसन महाराज साखरे यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Prayagraj Kumbh Parva 2025 : कुंभमेळ्यात साकारली लक्षवेधी ८५ फूट उंच ‘तेजस विमाना’ची प्रतिकृती !

त्रिवेणी बांध, दारागंज येथील रामानंदाचार्य मठाचे शिबीर : या शिबिराच्या प्रवेशद्वारावर या विमाना’ची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. त्यामुळे हे शिबीर कुंभमेळ्यात येणार्‍या सर्व भाविकांना आकर्षित करत आहे !

कुंभमेळ्यातील सेक्टर ५ मधील अवैध दुकाने प्रशासनाने तोडली !

काही दुकानदारांनी ‘सनातन प्रभात’ला अधिकार्‍यांनी दुकान लावण्यासाठी पैसे घेतल्याचे म्हटले. याविषयी प्रशासकीय अधिकार्‍यांच्या नावाने नेमके कुणी पैसे घेतले ? याविषयी चौकशी होणे आवश्यक आहे.

खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना दरपत्रक प्रदर्शित करणे बंधनकारक

शुश्रृषालयाच्या बाहेर दरपत्रक प्रदर्शित न करणार्‍या खासगी वैद्यकीय व्यावसायिकांवर महाराष्ट्र शुश्रृषा नोंदणी अधिनियम २०२१ (सुधारीत) नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

तीर्थराज प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संकल्पपूजन आणि प्रार्थना !

‘विश्‍वकल्याणासाठी भारतात हिंदु राष्ट्र स्थापन व्हावे’, या धर्मसंस्थापनेच्या उद्देशाने तीर्थराज प्रयागराज येथील महाकुंभपर्वात संकल्पपूजन अन् प्रार्थना करण्यात आली.

कोकणचा विकास आणि सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रयत्न करणार ! – गृहराज्यमंत्री योगेश कदम

कोकणचा विकास आणि सिंचन यांचा अनुशेष भरून काढण्यासाठी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याची ग्वाही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.