विहिंपकडून मौलाना शहाबुद्दीन यांच्याविरुद्ध तक्रार प्रविष्ट !

महाकुंभाची भूमी वक्फ बोर्डाची असल्याचे विधान केल्याच्या प्रकरणी विश्‍व हिंदु परिषदेने मौलाना शहाबुद्दीन यांच्याविरुद्ध येथील सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.

‘नरवीर तानाजी मालुसरेंची सिंहगडावरील शौर्यगाथा’ फ्लेक्सच्या भव्य प्रदर्शनाची पुणे येथे यशस्वी सांगता !

या प्रदर्शनाला प्रा. नामदेवराव जाधव, ॲडमिरल नाडकर्णी, एअर मार्शल प्रदीप बापट, मेजर जनरल शिशिर महाजन, ‘नॅशनल बुक ट्रस्ट’चे विश्वस्त राजेश पांडे या मान्यवरांची उपस्थिती लाभली.

True National Anthem : ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रगीत व्हावे ! – पू. रामगिरी महाराज, महंत, सद्गुरु गंगागिरी महाराज संस्थान

राष्ट्रगीताच्या संदर्भात मी जे बोललो आहे, तो राष्ट्रगीताचा अवमान नसून ते विश्‍लेषण आहे. इतिहासाचे संशोधन व्हायला हवे. राष्ट्रगीतातून देशाची स्तुती व्हावी, ही माझी मागणी आहे.

प्रयागराजमध्ये थंडीची लाट आल्याने काळजी घेण्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आवाहन !

प्रयागराजमध्ये सध्या थंडीची लाट आली आहे. यामुळे लोकांनी स्वत:चे आणि आप्तेष्ट यांचे त्यापासून रक्षण व्हावे, अशी काळजी घ्यावी.

चिन्मय कृष्णदास यांच्या सुटकेसाठी, तसेच बांगलादेशी हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकारने हस्तक्षेप करावा !

भारताने बांगलादेशाशी असलेले सर्व संबंध तोडावेत आणि प्रसंगी सैनिकी कारवाई करण्यास मागे-पुढे पाहू नये, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर येथे ८ जानेवारी या दिवशी टिळक चौक येथे मूक आंदोलन करण्यात आले.

महाकुंभमेळ्याच्या सुरक्षेसाठी सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांचे आगमन !

महाकुंभ क्षेत्राला एका जिल्ह्याचा दर्जा दिल्यामुळे तेथे पोलीस ठाणी आणि पोलीस चौक्या यांसह एक वरिष्ठ पोलीस अधीक्षक दिला आहे.

महाकुंभाच्या सुरक्षाव्यवस्थेसाठी अडीच कोटी रुपये मूल्यापर्यंतचे ‘अश्‍वशक्ती’ घोडे तैनात !

महाकुंभ-२०२५ च्या सुरक्षाव्यवस्थेत ‘अश्‍वशक्ती’ नावाचे घोडे तैनात करण्यात आले आहेत. हे घोडे सामान्य नाहीत. त्यांना चांगल्याप्रकारे प्रशिक्षित करण्यात आले आहे.

‘इस्रो’च्या प्रमुखपदी व्ही. नारायणन् यांची नियुक्ती !

‘भारतीय अंतराळ संशोधन संस्था’ म्हणजे ‘इस्रो’च्या प्रमुखपदी प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. व्ही. नारायणन् यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते १४ जानेवारीपासून सूत्रे हाती घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Firozabad ShivMandir Reopened : फिरोजाबाद (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानबहुल भागात ३० वर्षांपासून बंद असणारे शिवमंदिर उघडण्यात आले !

मंदिराची माहिती मिळताच हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जाऊन तेथे स्वच्छता केली. तसेच हनुमान चालिसाचे पठण केले. त्यापूर्वी प्रशासनाने मंदिराचे कुलूप उघडले.

Trump Broadcasts Canada US Map : डॉनल्ड ट्रम्प यांनी प्रसारित केला कॅनडा हा अमेरिकेचा भाग असलेला नकाशा !

कॅनडाचे काळजीवाहू पंतप्रधान ट्रुडो आणि इतर नेते यांनी ट्रम्प यांचा हा विचार पूर्णपणे फेटाळून लावला आहे. ट्रुडो यांनी ‘कॅनडा कधीही अमेरिकेचा भाग होऊ शकत नाही’, असे म्हटले आहे.