खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना दरपत्रक प्रदर्शित करणे बंधनकारक

रत्नागिरी (जि.मा.का.) –  जिल्ह्यातील खासगी वैद्यकीय व्यावसायिक आणि ‘क्लिनिकल पॅथॉलॉजी लॅब’ यांनी महाराष्ट्र शुश्रृषागृह नोंदणी अधिनियम २०२१ अनुसूची ३ नुसार शुश्रृषागृहाच्या दर्शनी भागात दरपत्रक प्रदर्शित करणे बंधनकारक आहे.

प्रवेश शुल्क, प्रतिदिनी आंतररुग्ण दर (खाटा/अतिदक्षता कक्ष), वैद्य शुल्क (प्रतिभेट), साहाय्यक वैद्य शुल्क (प्रतिभेट), भूल शुल्क (प्रतिभेट), शस्त्रक्रिया शुल्क, शस्त्रक्रिया साहाय्यक शुल्क, भूल साहाय्यक शुल्क (प्रतिभेट), शुश्रृषा शुल्क (प्रतिदिन), सलाईन आणि रक्त संक्रमण शुल्क, विशेष भेट शुल्क, पॅथॉलॉजी शुल्क, ऑक्सिजन शुल्क, रेडियोलॉजी आणि सोनोग्राफी शुल्क आदी सेवांचे दरपत्रक लावणे बंधनकारक आहे.

यानुसार माहिती संबंधित प्रशासनास सादर न करणार्‍या आणि शुश्रृषालयाच्या बाहेर दरपत्रक प्रदर्शित न करणार्‍या खासगी वैद्यकीय व्यावसायिकांवर महाराष्ट्र शुश्रृषा नोंदणी अधिनियम २०२१ (सुधारीत) नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा शल्यचिकित्सकांनी कळवले आहे.