उरण येथे ४ घरांमध्ये चोरी !

येथील वेश्वी गावातील ४ घरांमध्ये अज्ञात चोरांनी घरफोडी केली. चोरांनी बंद घरांच्या कड्या आणि खिडक्यांचे लॉक तोडून घरात प्रवेश केला. त्यांनी २५ लाख रुपयांचा ऐवज चोरला. त्यांची ही कृती सीसीटीव्ही कॅमेर्‍यात बंदिस्त झाली आहे.

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी : सांगली येथील मार्केट यार्ड बँक चोरीप्रकरणी गुन्हेगाराला अटक !….‘वक्फ बोर्डा’ने केलेल्या भूमीसंपादनाच्या विरोधात बेळगाव येथे १ डिसेंबरला आंदोलन !…..

सांगली येथील मार्केट यार्ड बँक चोरीप्रकरणी  गुन्हेगाराला अटक ! सांगली, २९ नोव्हेंबर (वार्ता.) – शहरातील मार्केट यार्ड परिसरातील ‘तासगाव अर्बन बँके’च्या शाखेत चोरीचा प्रयत्न करणार्‍या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. ओंकार विशाल साळुंखे, असे आरोपीचे नाव आहे. या घटनेतील २ संशयित आरोपी सुदर्शन यादव आणि मुनीब उपाख्य बाबू भाटकर पसार झाले आहेत. या ३ … Read more

आळंदी (पुणे) येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या वेळी चोर्‍या !

सोहळ्यानिमित्त पोलीस बंदोबस्त असतांना अशा घटना घडतात, म्हणजेच पोलिसांचा वचक अल्प झाला आहे, हेच लक्षात येते !

पैठण तालुक्यातील मारुति मंदिरात चोरी !

जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील ढोरकीन गावातील मारुति मंदिरात चोरी झाल्याची घटना ७ नोव्हेंबर या दिवशी उघडकीस आली. चोरट्यांनी मूर्तीवरील ७० सहस्र रुपयांचे दागिने चोरले आहेत.

ATM money theft : मशिदीतून ३७ लाख रुपये जप्त : ३ मुसलमान तरुणांना अटक  !

चोरीचा पैसे मंदिरातून जप्त करण्यात आला असता, तर देशपातळीवर बातमी झाली असती; मात्र येथे मशिदीतून पैसा जप्त केल्यावर प्रसारमाध्यमे बातमी दडपतात, हे लक्षात घ्या !

चंदन चोरट्यांवर उपचार करणार्‍या आधुनिक वैद्यांवर गुन्हा नोंद करणार ! – पुणे पोलीस

विधी महाविद्यालयाच्या रस्त्यावर गस्त घालणार्‍या पोलिसांवर चंदन चोरांनी आक्रमण केले. स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये घायाळ झालेल्या चोरट्यांवर वैद्यकीय उपचार करणार्‍या आधुनिक वैद्यावर गुन्हा नोंद करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी दिली आहे.

ईश्वरपूर येथे दुकानातून खाद्यपदार्थ चोरणार्‍या टोळीला अटक !

आरोपींकडून पोलिसांनी छोटा हत्ती वाहन मिळून ३.९६ लाख रुपयांचा माल जप्त केला आहे, अशी माहिती येथील पोलीस निरीक्षक संजय हारूगडे यांनी दिली.

Australia Hindu Temples Vandalised : ऑस्ट्रेलियाच्या राजधानीत हिंदूंच्या २ मंदिरांची तोडफोड आणि चोरी

हिंदूंच्या सणांच्या वेळी खलिस्तानी जाणीवपूर्वक हिंदूंना डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत. अशांचे नाक दाबण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे !