Kharghar Hindu Youth Killed By Muslims : खारघर (नवी मुंबई) येथे ‘इज्तिमा’नंतर हिंदु तरुणाची मुसलमानांकडून हत्या

‘इज्तिमा’च्या आयोजकांवर गुन्हा नोंदवा आणि संबंधितांना अटक करण्याचे आदेश द्या ! – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

(‘इज्तिमा’ म्हणजे मुसलमानांची धार्मिक सभा)

मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे

खारघर (नवी मुंबई) – येथे आयोजित इज्तिमा नंतर शिवकुमार शर्मा या हिंदु तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या हत्येनंतर मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे, ‘खारघरमधील एका हिंदु तरुणाच्या हत्येत २ मुसलमान तरुणांचा सहभाग आहे. क्षुल्लक कारणावरून त्याला शिरस्त्राणाने मारहाण करण्यात आली. आरोपी धार्मिक परिषदेतून (इज्तिमातून) परतत असतांना हा प्रकार घडला. या प्रकरणी इज्तिमाच्या कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हा नोंद करावा आणि संबंधितांना अटक करण्याचे आदेश द्यावेत. उच्चस्तरीय समितीच्या माध्यमातून चौकशी करावी.’ (मुख्यमंत्र्यांनी संबंधित आरोपींना अटक करून हिंदूंना न्याय मिळवून द्यावा, अशी हिंदूंची अपेक्षा आहे ! – संपादक)

आक्रमण आणि हत्या प्रकरणानंतर दोन्ही आरोपी पसार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. आरोपींचे वय अनुक्रमे २२ आणि २५ वषेर्र् असे आहे.

नितेश राणे यांच्याकडून मृताच्या कुटुंबियांची भेट घेत न्याय देण्याचे आश्‍वासन !

मंत्री नितेश राणे यांनी मृत शिवकुमार शर्मा यांच्या घरी भेट देऊन कुटुंबियांना आश्‍वस्त केले की, त्यांना नक्कीच न्याय मिळेल. मृत शिवकुमार शर्मा यांना ४ बहिणी असून त्या न्यायासाठी याचना करत आहेत. ही घटना म्हणजे हिंदूंच्या विरोधातील षड्यंत्र आहे. सरकार आरोपींवर कठोर कारवाई करील.

मृताचे नातेवाईक ध्रुव शर्मा यांनी आरोप केला आहे की, शिवकुमार शर्मा यांची जाणीवपूर्वक हत्या करण्यात आली आहे. त्याला अपघात मानता येणार नाही. या हत्येचा व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये काही मुले शिवकुमार शर्मा यांना मारहाण करतांना दिसत आहेत.

संपादकीय भूमिका

  • हिंदूंच्या धार्मिक सभेनंतर किंवा कार्यक्रमानंतर कधी त्यांच्याकडून हिंसाचार झाल्याचे ऐकले आहे का ? उलट हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर मशिदींवरून आक्रमणे केली जातात. आता या घटनेत मुसलमानांच्या कार्यक्रमानंतर हिंदूंची हत्या करण्यात आली. हे तथाकथित ‘पुरोगामी’ महाराष्ट्राला लज्जास्पद आहे !
  • या घटनेविषयी हिंदुत्वनिष्ठ वगळता अन्य राज्यकीय पक्ष किंवा निधर्मीवादी का बोलत नाहीत ? ते कुणी का बोलत नाहीत ?
  • ‘एक हैं तो सैफ हैं’ हे या घटनेवरून हिंदूना नाही, तर मुसलमानांना लागू पडत आहे का ?, असा प्रश्‍न पडतो !
  • (म्हणे) ‘हिंदु-मुसलमानांमध्ये भांडणे निर्माण करणार्‍या नितेश राणे यांना मंत्रीमंडळातून काढावे !’ 

  • समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी ! 

अबू आझमी

समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी ७ फेब्रुवारी या दिवशी पत्रकार परिषद घेत सांगितले की, नितेश राणे हे द्वेषाचे पुजारी आहेत. असे लोक नेहमीच महाराष्ट्राचे वातावरण बिघडवण्यासाठी हिंदु-मुसलमानांमध्ये भांडणे निर्माण करण्याचे काम करतात. मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करतो की, त्यांना (नितेश राणे यांना) मंत्रीमंडळातून काढावे. जर नितेश राणे असे म्हणत असतील की, ‘इज्तिमानंतर त्यात सहभागी असलेल्या काही लोकांनी मारहाण केल्याने एखाद्याचा मृत्यू झाला’, तर पोलिसांनी त्या प्रकरणाची चौकशी करून दोषीला शिक्षा करावी; परंतु अशा कोणत्याही घटनेसाठी महाराष्ट्रात इज्तिमावर बंदी घालण्याची मागणी करणे, हे पूर्णपणे चुकीचे आहे.

इज्तिमामध्ये मुसलमानांनी शरियत आणि धर्म यांव्यतिरिक्त हिंदूंसह इतर धर्मांच्या लोकांशी कसे एकरूपतेने रहावे, हे सांगितले जाते. नितेश राणे महाराष्ट्रात जातीयवादाला चालना देण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या मुसलमान संघटनेवर ते बंदी घालण्याची मागणी करत आहेत, त्या संघटनेवर लावण्यात आलेले आरोप खोटे आहेत. ही संघटना तरुणांना योग्य मार्गावर आणण्याचे काम करते आणि सरकारलाही साहाय्य करते. ती कुणालाही भडकवण्याचे काम करत नाही. (महाराष्ट्रात इज्तिमाचे आयोजन ‘तबलिगी जमात’ ही संघटना करते. या संस्थेवर सौदी अरेबिया, उझबेकिस्तान आणि इतर अनेक देशांमध्ये बंदी घालण्यात आलेली आहे; कारण तिच्यावर कट्टरपंथीय विचारसरणी पसरवणे, आतंकवादी विचारधारेचे पोषण करणे अन् अवैध आर्थिक व्यवहार करण्याचे आरोप आहेत. असे असतांना ‘ही संघटना निर्दोष आहे’, असे म्हणणे, म्हणजे ‘आझमी एक प्रकारे आतंकवादाचीच पाठराखण करत आहेत’, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही ! – संपादक)

संपादकीय भूमिका

हिंदु-मुसलमानांमध्ये भांडणे कोण लावत आहे आणि हिंदु धर्माचे पुरस्कर्ते कोण आहेत, हे जनता पुरते ओळखून आहे. त्यामुळे अबू आझमी यांनी याविषयी सांगण्याची आवश्यकता नाही !