Advocate Vishnu Shankar Jain : मंदिरांची पुनर्स्थापना ईश्वरी कार्य असल्याने प्रत्येकाने यात सहभागी व्हावे !

‘जय श्रीराम’ आणि ‘हर हर महादेव’ च्या उत्स्फूर्त जयघोषात ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ पुरस्कार प्रदान सोहळा साजरा !

अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांना पुरस्कार प्रदान करतांना अधिवक्ता उज्ज्वल निकम आणि सावरकर मंडळाचे पदाधिकारी

पुणे – हिंदूंची श्रद्धास्थाने म्हणजेच मंदिरे नष्ट केली म्हणजे त्यांची संस्कृती नष्ट होईल, असे मोगलांचे कारस्थान होते. आता त्याच्या पुढची पायरी म्हणजे भूमी जिहादद्वारे हिंदूंच्या भूमी बळकावणे, मंदिरे तोडून त्यावर मशिदी उभारणे; पण यामध्ये न्यायालयाने आम्हाला न्याय दिला; म्हणूनच आताच्या काळात तलवारीच्या जोरावर नव्हे, तर लेखणीच्या जोरावर युद्ध जिंकले, असे आपण म्हणू शकतो. मंदिरांची पुनर्स्थापना करणे हे ईश्वरी कार्य आहे आणि त्यात प्रत्येकाने सहभागी व्हावे, असे आवाहन सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी येथे केले. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनानिमित्त निगडी प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने २६ फेब्रुवारीला ग.दि. माडगूळकर नाट्यगृहात ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ पुरस्कार प्रदान सोहळा २०२५ पार पडला. या वेळी , पद्मश्री पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ अधिवक्ता उज्ज्वल निकम यांच्या हस्ते अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांना एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह प्रदान करून राष्ट्रीय पुरस्काराच्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथन् नायर आणि अधिवक्ता उज्ज्वल निकम यांच्या हस्ते हिंदुत्वनिष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मीरा अ. कडबे यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राज्यस्तरीय पुरस्कार २०२५’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. कडबे यांना ५१ सहस्र रुपये आणि सन्मानचिन्ह प्रदान करून त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला. स्वा. सावरकर मंडळाच्या प्रतिनिधींनी  अधिवक्ता उज्ज्वल निकम यांचा सत्कार करून त्यांना सन्मानचिन्ह आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा भेट दिली.

शरिरात प्राण असेपर्यंत धर्मासाठी लढणार ! – विष्णु शंकर जैन

अधिवक्ता विष्णु शंकर जैन

अधिवक्ता विष्णु शंकर जैन पुढे म्हणाले की, शरिरात प्राण असेपर्यंत मी धर्मासाठी लढणार आहे. ज्याप्रमाणे आम्ही श्री राममंदिरासाठी खटला लढवला त्याचप्रमाणे ज्ञानवापीसाठी आणि मथुरेसाठी खटला लढत आहोत. मध्यप्रदेशातील भोज येथील सरस्वतीमातेच्या मंदिरासाठीही खटला लढत आहोत. ज्ञानवापी मुक्त झाली पाहिजे, ही  छत्रपती शिवाजी महाराजांची अखेरची इच्छा होती त्यासाठी आम्ही हे खटले लढत आहोत.

उपस्थित प्रेक्षक

आध्यात्मिक अनुष्ठानात सातत्य ठेवल्यास वेळ निश्चित पालटते !

अधिवक्ता विष्णु शंकर जैन म्हणाले की, काही वर्षांपूर्वी रामजन्मभूमीचा खटला लढवणे हा शाप होता; मात्र एखाद्या व्यक्तीने आपल्या आध्यात्मिक अनुष्ठानात सातत्य ठेवले, तर वेळ निश्चित पालटते, हे सद्यःस्थितीवरून लक्षात येते; मात्र अयोध्येत मुसलमानांना मशीद बांधण्यासाठी ५ एकर भूमी देणे चुकीचे आहे; कारण त्यामुळे धर्मांध पुन्हा एकदा मंदिर तोडण्याचे षड्यंत्र आखत आहेत. काही दिवसांपूर्वी मी शनिवारवाड्याला भेट दिली, तेव्हा तिथे अखंड हिंदुस्थानचे चित्र तुटलेल्या स्थितीत आढळले. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे अखंड हिंदु राष्ट्राचे स्वप्न होते. त्यासाठी ते चित्र परत चांगल्या स्थितीत यावे यासाठी प्रयत्न व्हावेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाला भेट दिल्यानंतर मला तिथून जी प्रचंड ऊर्जा मिळाली त्या ऊर्जेच्या बळावर मी दुपटीने धर्मकार्य करण्यासाठी सिद्ध झालो आहे.

अखंड हिंदु राष्ट्र बनवण्याचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्वप्न आपण पूर्ण केले पाहिजे ! – पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन

मुसलमान आक्रमकांनी हिंदूंच्या मंदिरांचे मशिदींमध्ये रूपांतर केले. ज्या मंदिरांना तोडून मशीद बनवण्यात आली आहे, ती मंदिरे परत कह्यात घेणे हे आपले दायित्व आहे. हिंदु धर्म वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्रित येणे आवश्यक आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्वप्न म्हणजेच अखंड हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, असे या वेळी दाखवण्यात आलेल्या व्हिडिओद्वारे पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांनी सांगितले.

छळ, बळ, भावनिक खच्चीकरण, वशीकरण यांमधून ‘लव्ह जिहाद’ केला जातो ! – मीरा अ. कडबे, हिंदुत्वनिष्ठ सामाजिक कार्यकर्त्या

छळ, बळ, भावनिक खच्चीकरण, वशीकरण यामधून ‘लव्ह जिहाद’ केला जातो. प्रतिवर्षी २ लाख मुलींना मुसलमान तरुण ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून फसवतात. ‘लव्ह जिहाद’मध्ये धर्मांध खोटी हिंदु नावे धारण करून, खोटे व्यवसाय सांगून मुलींना फसवतात, त्यांच्याशी जवळीक साधतात. हे धर्मयुद्ध आहे. ‘लव्ह जिहाद’ हे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र आहे, लोकसंख्या विषम करण्यासाठीचे नियोजन आहे. त्यासाठी शालेय अभ्यासक्रमातच धर्मशिक्षणाचा समावेश केल्यास ही परिस्थिती पालटू शकते. प्रत्येक घरातील मुलींना भावनिक बळ द्या. लव्ह जिहादच्या षड्यंत्राला बळी न पडण्यासाठी मुलींवर संस्कार करा, मुलींशी संवाद साधा. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मार्पणाच्या दिवशी आपण हा संकल्प घेऊया, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

‘छावा’ चित्रपटातून अत्यंत परखडपणे इतिहास दाखवण्यात आला आहे ! – अधिवक्ता उज्ज्वल निकम

अधिवक्ता उज्ज्वल निकम यांचा सन्मान करतांना सावरकर मंडळाचे पदाधिकारी

‘लव्ह जिहाद’च्या घटना वाढण्यामागे पालक आणि पाल्य यांच्यामध्ये सुसंवाद नाही, हे एक कारण आहे. नैतिकतेचे दायित्व पालकांचेही आहे. छत्रपती संभाजी महाराजांवरील ‘छावा’ चित्रपटामध्ये त्यांचा इतिहास परखडपणे दाखवला आहे. महाराष्ट्राबाहेरच्या कित्येकांना त्यांचा इतिहास ठाऊक नाही. हिंदु धर्मासाठी प्राणांचे बलीदान देऊन राष्ट्रप्रेम जागृत करण्याचा आदर्श त्यांनी समाजासमोर घालून दिल्यामुळे हा चित्रपट चालला आहे.

पू. हरि शंकर जैन यांनी एक रुपयाही न घेता श्रीराम जन्मभूमीसाठी खटला लढवला !

पू. हरि शंकर जैन

प्रकृती अस्वास्थ्यामुळे पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन हे पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत. जैन यांनी हिंदुत्व यांसाठी केलेल्या कार्याचा व्हिडिओ या वेळी दाखवण्यात आला. पू. हरि शंकर जैन यांनी एक रुपयाही न घेता हिंदु महासभेच्या वतीने श्रीराम जन्मभूमीसाठी खटला लढवला. हे ऐकून उपस्थित श्रोत्यांनी उत्स्फूर्तपणे ‘जय श्रीराम’ या घोषणा दिल्या.

क्षणचित्रे

१. ज्ञानवापीच्या खटल्याविषयीची अनुभूती सांगतांना संपूर्ण सभागृह ‘हर हर महादेव’च्या घोषणांनी दुमदुमले.

२. ‘अयोध्या तो झाकी है, काशी, मथुरा अभी बाकी है ।’, अशा घोषणा देण्यात आल्या. ‘परात्पर गुरु डॉक्टर आठवलेजी को नमन’, असे म्हणून अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी आपल्या भाषणाला प्रारंभ केला.

३. अधिवक्ता विष्णु शंकर जैन त्यांच्या अनुभूती सांगत असतांना उपस्थितांच्या डोळ्यांत भावाश्रु आले. लोकांनी उभे राहून विष्णु शंकर जैन यांना अभिवादन केले.