प्रयागराज कुंभपर्व २०२५
पोलिसांनी हस्तक्षेप करून बंद पाडला कार्यक्रम !
प्रयागराज (उत्तरप्रदेश) : येथील कुंभमेळ्यातील कलाग्राममध्ये रात्री १२ वाजेपर्यंत हिंदी चित्रपटांच्या गाण्यांसह ऑर्केस्ट्रा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, जो पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर बंद करण्यात आला. पोलिसांनी हस्तक्षेप करून कार्यक्रम बंद केला. यावरून असे दिसते की, या प्रकारच्या कार्यक्रमासाठी अधिकृत अनुमती नव्हती. प्रत्यक्षात आध्यात्मिक स्थळाच्या ठिकाणी हिंदी चित्रपटातील गाणी वाजवण्याची अनुमती कुणी दिली ? या ठिकाणी अशा स्वरूपाचे कार्यक्रम कसे काय घेतले जातात ? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात.
संपादकीय भूमिकामहाकुंभमेळ्याला गालबोट लावण्यासाठी असा प्रकार केला गेला का, याचे अन्वेषण करून संबंधितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे ! |