हिंदी भाषेची सक्ती खपवून घेणार नाही ! – गजानन काळे, प्रवक्ते, मनसे
महाराष्ट्रात हिंदी भाषेची सक्ती खपवून घेतली जाणार नाही, अशी चेतावणी मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी येथे पत्रकारांशी बोलतांना दिली. महाराष्ट्र शासनाने नुकताच काढलेल्या शासन निर्णयानुसार सर्व शाळांनी त्रिभाषा सूत्र राबवायचे आदेश दिले आहेत.