Advocate Vishnu Shankar Jain : पुरस्कार सोहळ्यासाठी अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांचे पुणे येथे आगमन !

पुणे येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार प्रदान सोहळा २०२५’

पुणे, २६ फेब्रुवारी (वार्ता.) : निगडी येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार प्रदान सोहळा २०२५’साठी सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांचे २६ फेब्रुवारीला पुणे विमानतळावर सकाळी ७.३० वाजता आगमन झाले. या वेळी सनातन संस्थेच्या वतीने सौ. विनोदिनी भोळे यांनी त्यांचे औक्षण केले. या प्रसंगी हिंदुत्वनिष्ठ श्री. भूषण भोळे आणि ‘सनातन प्रभात’चे वाचक, गोरक्षक, गोशाळा चालक आणि आसाराम बापू संप्रदायाचे साधक श्री. हेमंत उपरे हे उपस्थित होते.

पुणे विमानतळावर अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांचे औक्षण करतांना सनातनच्या साधिका सौ. विनोदिनी भोळे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी काढले गौरवोद्गार !

रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रम, तसेच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या भेटीविषयी विचारले असता त्यांनी सांगितले की, जेव्हा मी सनातन आश्रमात परात्पर गुरुदेव यांना भेटलो, त्यानंतरच माझ्या कार्याला शक्ती मिळाली. मी तोपर्यंत कुणालाही माझे गुरु मानले नव्हते. जेव्हा परात्पर गुरु भेटले, तेव्हापासून तेच माझे आध्यात्मिक गुरु आहेत आणि ते आता सगळे काही आहेत. हे सांगतांना त्यांच्या डोळ्यात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांप्रती अत्युच्च भाव दिसत होता.