राष्ट्रविघातक कृत्यांना प्रोत्साहन मिळणार्‍या घटनांविरोधात कारवाई करा !

१५ ऑगस्ट २०२४ या दिवशी जिल्ह्यातील नागठाणे येथील काही विद्यार्थी आणि शिक्षक यांनी राष्ट्रध्वजाला प्रणाम न करता त्याचा अपमान केला होता. ‘भारतमाता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’ या घोषणा देण्यासही नकार दिला होता.

कोकणचा विकास आणि सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रयत्न करणार ! – गृहराज्यमंत्री योगेश कदम

कोकणचा विकास आणि सिंचन यांचा अनुशेष भरून काढण्यासाठी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याची ग्वाही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.

Prayagraj Kumbh Parva 2025 : महाकुंभक्षेत्री आग लागलेल्या घटनास्थळी सनातन संस्थेच्या साधकांचे प्रशासनास साहाय्य !

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सनातन संस्थेच्या साधकांनी तात्काळ आग लागलेल्या ठिकाणी जाऊन तेथील अग्नीशमन दल, पोलीस, एन्.डी.आर्.एफ् आणि प्रशासकीय कर्मचारी यांना साहाय्य केले.

BMC Demolished Chembur Madarsa : चेंबूर येथील अवैध मदरसा मुंबई महापालिकेने पाडला !

संपादकीय भूमिकाअवैध मदरसा उभारला जात असतांनाच पालिकेने त्याला विरोध का केला नाही ? विहिंपला कारवाई होण्यासाठी पाठपुरावा का करावा लागला ? अशी निष्क्रीयता करणार्‍या संबंधित अधिकार्‍यांवरही कारवाई झाली पाहिजे !

‘ई-हक्क’ प्रणालीचा वापर करून वारस नोंदी ऑनलाईन करता येणार !

नागरिकांना ई-फेरफार प्रणालीला पूरक असलेल्या ‘ई-हक्क’ प्रणालीचा (पब्लिक डाटा एन्ट्री) वापर करून वारस नोंद, सात-बारावरील इकरार नोंदी, मयतांचे नाव अल्प करणे इत्यादी कामे करता येणार आहे. त्यामुळे नागरिकांना तलाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची आवश्यकता भासणार नाही.

Jharkhand School Punishment To Girl Students : झारखंडमधील मिशनरी शाळेत ८० विद्यार्थिनींना त्यांचे शर्ट काढून ‘ब्लेझर’ घालून घरी पाठवले !

मिशनरी शाळांमध्ये वाद का होतात, याचा विचार करता सरकारने त्यांच्यावर विशेष नियंत्रण ठेवणारा विभाग स्थापन करणे आता आवश्यक झाले आहे !

विशाळगडावर जाणार्‍यांच्या सर्व नोंदी ठेवण्यासह अन्य उपाययोजनाही कराव्यात !

प्रशासनाने ५ जानेवारीपासून विशाळगड पर्यटकांसाठी खुला केला आहे; मात्र काही धर्मीय आणि अन्य संघटनांच्या मागणीमुळे हा आदेश काढण्यात आला आहे का ? तरी गडावर जे पर्यटक जातात, ते अन्य हेतूने जात नाहीत ना, हे पहाण्यासाठी त्यांचे आधारकार्ड पडताळण्यात यावे, त्यांच्या पूर्ण नोंदी ठेवाव्यात, गडावर गेलेले सर्वजण खाली येतात का ?….

महाकुंभमेळ्यात पाणी आणि वीज यांची सुविधा न पुरवल्याने साधूंचे आंदोलन !

प्रशासनातील काही जणांकडून सुविधांसाठी पैशांची मागणी होते, असा आरोपही साधूंनी आंदोलनाच्या वेळी केला. प्रशासकीय अधिकार्‍यांकडे साधूंनी निषेध नोंदवला

अहिल्यानगर शहरात वाहतुकीस अडथळा ठरणारे थडगी त्वरित हटवावीत !

हिंदूंना अशी चेतावणी द्यावी लागणे, हे प्रशासनासाठी लज्जास्पद ! हिंदुत्वनिष्ठांनी अशी कृती करण्यापूर्वीच प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी, हीच अपेक्षा !

सातारा जिल्हाधिकारीपदी संतोष पाटील यांची नियुक्ती !

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे पुणे जिल्हाधिकारी म्हणून स्थानांतर झाले आहे. त्यांच्या जागेवर संतोष पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.