‘ई-हक्क’ प्रणालीचा वापर करून वारस नोंदी ऑनलाईन करता येणार !

मुंबई – नागरिकांना ई-फेरफार प्रणालीला पूरक असलेल्या ‘ई-हक्क’ प्रणालीचा (पब्लिक डाटा एन्ट्री) वापर करून वारस नोंद, सात-बारावरील इकरार नोंदी, मयतांचे नाव अल्प करणे इत्यादी कामे करता येणार आहे. त्यामुळे नागरिकांना तलाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची आवश्यकता भासणार नाही. नागरिकांना तलाठी कार्यालयात न जाता महसूल संदर्भातील कामे घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने करता येतील.

१. ‘ई-हक्क’ प्रणाली आधारे नागरिकांना वारसा नोंद करता येईल. ‘ई-फेरफार’ आधारे तलाठ्यांना हे काम करता येईल.

२. pdeigr.maharshtra.gov.in या संकेतस्थळावर नागरिकांना सहकारी संस्थांना अगोदर ‘लॉगिन’ करावे लागेल. त्यासाठी अगोदर ‘साईन-अप’, नोंदणी करावी लागेल. त्यानंतर वरील स्वरूपाची कामे करता येतील. ई-हक्क प्रणालीचा वापर करून ८ प्रकारच्या नोंदी घरबसल्या करता येतील.