BMC Demolished Chembur Madarsa : चेंबूर येथील अवैध मदरसा मुंबई महापालिकेने पाडला !

विश्व हिंदु परिषदेच्या पाठपुराव्याचा परिणाम !

विश्व हिंदु परिषदेच्या पाठपुराव्यामुळे या अनधिकृत बांधकामावर करण्यात आली कारवाई !

मुंबई : चेंबूर ट्राँबे येथील पायलीपाडा परिसरात उभारलेल्या अवैध मदरशावर मुंबई महापालिकेने कारवाई करून तो पाडला. विश्व हिंदु परिषदेच्या पाठपुराव्यामुळे या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. ‘दारूल उलुम फैझान ए रझा’ या नावाने तो उभारण्यात आला होता.

१. या मदरशाच्या विरोधात ‘पायलीपाडा ग्रामस्थ मंडळा’ने वर्ष २०२० पासून महानगरपालिकेकडे पत्रव्यवहार केला होता; परंतु महापालिकेने त्यावर कारवाई केली नाही. याचा अपलाभ घेत शराफत खान नामक व्यक्तीने ४ मजल्यांचे अवैध बांधकाम वाढवले. त्याला पालिकेकडून नळजोडणी घेतली. (कुणाचाच धाक नसल्याने धर्मांधांचे अशा प्रकारे फावते ! – संपादक)

२. ‘पायलीपाडा ग्रामस्थ मंडळा’ने या प्रकरणात सहकार्य करण्यासाठी विहिंपला निवेदन दिले. विहिंपच्या वतीने अधिवक्ता अनुप पाल यांनी महापालिका साहाय्यक आयुक्तांकडे तक्रार करून या प्रकरणाची विचारणा केली. त्यानंतर पालिका प्रशासनाने मदरशाचे अनधिकृत बांधकाम पाडले.

संपादकीय भूमिका

अवैध मदरसा उभारला जात असतांनाच पालिकेने त्याला विरोध का केला नाही ? विहिंपला कारवाई होण्यासाठी पाठपुरावा का करावा लागला ? अशी निष्क्रीयता करणार्‍या संबंधित अधिकार्‍यांवरही कारवाई झाली पाहिजे !