महाकुंभमेळ्यात पाणी आणि वीज यांची सुविधा न पुरवल्याने साधूंचे आंदोलन !

आंदोलनकर्त्या साधूंशी बोलतांना प्रशासनातील अधिकारी

प्रयागराज, ८ जानेवारी (वार्ता.) – महाकुंभमेळयातील मोरी मुक्ती मार्ग, सेक्टर १९ येथे काही साधूंनी आंदोलन केले. प्रशासनाकडून पाणी आणि वीज इत्यादी सुविधा पुरवण्यात येत नाहीत, असे या साधूंचे म्हणणे होते. प्रशासनातील काही जणांकडून सुविधांसाठी पैशांची मागणी होते, असा आरोपही साधूंनी आंदोलनाच्या वेळी केला.

प्रशासकीय अधिकार्‍यांना जाब विचारतांना आंदोलक साधू

या वेळी आलेल्या प्रशासकीय अधिकार्‍यांकडे साधूंनी निषेध नोंदवला आणि त्यांना असुविधांवरून जाब विचारला.