मुंबई महापालिकेचा ७४ सहस्र कोटींचा अर्थसंकल्प सादर !
देशातील सर्वांत श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी ४ फेब्रुवारी या दिवशी सादर केला. या बजेटमध्ये ७४ सहस्र ४२७.४१ कोटींचे प्रावधान करण्यात आले आहे.