सातारा, ४ जानेवारी (वार्ता.) – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे पुणे जिल्हाधिकारी म्हणून स्थानांतर झाले आहे. त्यांच्या जागेवर संतोष पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
१८ महिन्यांच्या कालावधीमध्ये डुडी यांनी लोकाभिमुख निर्णय घेऊन जिल्ह्याच्या विकासाला चालना दिली. संतोष पाटील हे मूळचे बार्शी तालुक्यातील उंडेगाव येथील आहेत. वर्ष १९९६ मध्ये यवतमाळ उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांनी कामास प्रारंभ केला. वर्ष २०२४ पासून ते पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कामकाज पहात होते.