‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’ची सातारा येथील जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी

सातारा, २३ जानेवारी (वार्ता.) – १५ ऑगस्ट २०२४ या दिवशी जिल्ह्यातील नागठाणे येथील काही विद्यार्थी आणि शिक्षक यांनी राष्ट्रध्वजाला प्रणाम न करता त्याचा अपमान केला होता. ‘भारतमाता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’ या घोषणा देण्यासही नकार दिला होता. विद्यार्थी आणि शिक्षक यांनी राष्ट्राचा अपमान केला आहे. हे कृत्य भारताच्या सार्वभौमतेच्या आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने अपमानास्पद आहे. अशा राष्ट्रविघातक कृत्यांना प्रोत्साहन मिळणार्या घटनांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या वतीने सातारा जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
या वेळी हिंदु महासभेचे महाराष्ट्र प्रदेश कार्यवाह अधिवक्ता दत्ताजी सणस, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सातारा जिल्हा समन्वयक शिवाजीराव तुपे, विश्व हिंदु परिषदेचे माजी शहर मंत्री जितेंद्र वाडेकर, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे हेमंत सोनवणे, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. रूपा महाडिक, सौ. भक्ती डाफळे, तसेच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी सर्वश्री ऋतुराज गोडसे, गणेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्ह्यातील कोरेगाव, कराड, वाई, वडूज, रहिमतपूर येथेही प्रशासकीय अधिकार्यांना निवेदन देण्यात आले.