वैदिक सरस्वती नदी आणि तिचे दैवी स्वरूप !
जेव्हा आपण सरस्वतीच्या अंतर्धान पावण्याविषयी बोलतो, तेव्हा तो केवळ एखादी नदी आटण्याचा विषय नसतो, तर ते समाजातील सत्य, ज्ञान आणि शहाणपण यांच्या र्हासाचे प्रतीक असते. सरस्वतीचे अदृश्य होणे, म्हणजे ज्ञान आता सहज उपलब्ध, दृश्य किंवा महत्त्वपूर्ण राहिलेले नाही.