Power Of Hanuman Chalisa : हनुमान चालिसा पठण करणे ही केवळ भक्ती नाही, तर योगिक श्‍वासोच्छ्वासही आहे ! – मज्जातंतूशास्त्रज्ञ डॉ. श्‍वेता अदातिया

मज्जातंतूशास्त्रज्ञ डॉ. श्‍वेता अदातिया

दुबई – प्रसिद्ध मज्जातंतूशास्त्रज्ञ (न्यूरोलॉजिस्ट) डॉ. श्‍वेता अदातिया यांनी यू ट्यूबवर एक व्हिडिओ प्रसारित केला असून त्यामध्ये श्री हनुमान चालिसाचे वैज्ञानिक लाभ सांगितले आहेत. डॉ. श्‍वेता अदातिया यांनी म्हटले आहे की, हनुमान चालिसाचे पठण हृदय आणि मन यासाठी पुष्कळ लाभदायी आहे. त्यांनी सांगितले की, हनुमान चालिसा ‘योगिक श्‍वास’ मानली जाते. याचा अर्थ असा की, आपण ते वाचता तेव्हा आपला श्‍वासोच्छ्वास एका विशिष्ट पद्धतीचे अनुसरण करतो.

१. श्री हनुमान चालिसाच्या काही चौपाईंचे (ओळींचे) पठण करतांना, श्‍वास आत घेतला जातो (उदा. जय हनुमान ज्ञान गुण सागर), तर काही चौपाईंचे पठण करतांना, श्‍वास सोडला जातो (उदा. जय कपिस तिहू लोक उजागर), काहींमध्ये श्‍वास रोखून ठेवला जातो (उदा. रामदूत अतुलित बलधाम), काहींमध्ये श्‍वास रोखून ठेवल्यानंतर बाहेर जातो (उदा. अंजनी पुत्र पवन सुत नामा.)

२. डॉ. श्‍वेता अदातिया यांच्या मते, ही प्रक्रिया हृदय गती परिवर्तनशीलतेवर परिणाम करते, ज्यामुळे हृदयाची स्थिती निरोगी रहाण्यास साहाय्य होते. दुसरीकडे, जर हनुमान चालिसाचे योग्यरित्या पठण केले, तर त्याचा थेट परिणाम ‘लिंबिक सिस्टम’वर (मेंदूशी निगडित संस्थेवर) होतो, ज्यामुळे व्यक्तीची चिंता अल्प होते आणि त्याच्या आतला भय निघून जातो.

३. डॉ. श्‍वेता अदातिया यांनी सांगितले की, श्री हनुमान चालीसा वाचल्याने मज्जातंतू सक्रीय होतात,ज्यामुळे पचन आणि तणाव व्यवस्थापन यांसारख्या शरिराच्या अनेक कार्यांमध्ये साहाय्य होते.

४. श्री हनुमान चालीसा वाचल्याने हृदय आणि मन दोन्हीवर सकारात्मक परिणाम होतो हे प्रयोगांमधून दिसून आले आहे, असेहीडॉ. श्‍वेता अदातिया यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या देवतांच्या स्तोत्रांना नावे ठेवणार्‍या बुद्धीप्रामाण्यवाद्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?