|
जळगाव, १९ मार्च (वार्ता.) – येथील पिंजारी वाड्यात स्वतःच्या भाच्याचा शोध घेण्यासाठी गेलेले राष्ट्रीय बजरंग दलाचे शहरप्रमुख श्री. प्रवीण कोळी यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना धर्मांधांनी धमकावले. ‘श्री. कोळी यांनी मशिदीत तलवारी फिरवून मशिदीची नासधूस केली’, अशी अफवा धर्मांधांकडून सामाजिक माध्यमांत पसरवण्यात आली. त्यानंतर धर्मांधांनी न्यायालय परिसर आणि पोलीस ठाण्यात गोंधळ घालून श्री. कोळी यांच्यासह त्यांच्या कुटुंबाला धमकावून त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला. ही घटना १७ मार्च या दिवशी घडली. या प्रकरणी पोलिसांनी श्री. कोळी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली. न्यायालयाने श्री. कोळी यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
१. १६ मार्चला श्री. प्रवीण कोळी यांच्या घरातील लहान मुले खेळत असतांना अचानक श्री. प्रवीण यांचा भाचा दिसेनासा झाला.
२. श्री. कोळी हे पिंजारी वाड्यात भाच्याचा शोध घेऊ लागले. तेथील काही मुसलमानांनी त्यांच्याशी वाद घातला. मुसलमानांनी त्यांच्या सामाजिक माध्यमांत वरील अफवा पसरवली. यासह त्यांनी श्री. प्रवीण कोळी यांचे तेलंगाणाचे आमदार श्री. टी. राजासिंह यांच्यासमवेत असलेले छायाचित्र प्रसारित केले.
३. शनिपेठ पोलीस ठाण्यात दोन ते अडीच सहस्र धर्मांध एकत्र आले. तेथे मुसलमानांचे नेतेही उपस्थित होते. त्यांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घातला, तसेच श्री. प्रवीण कोळी यांच्या कुटुंबाला पोलीस ठाण्यात आणण्यास भाग पाडले.
४. धर्मांधांनी कोळी यांच्या कुटुंबाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून धमकावले. निश्चिती न करता त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यास पोलिसांवर दबाव आणला.
५. पोलिसांनी प्रवीण कोळी यांना न्यायालयात आणल्यानंतर धर्मांधांनी न्यायालयासमोरील रस्त्यावर गर्दी जमवून दहशत निर्माण केली; पण पोलीस-प्रशासनाने धर्मांधांना हुसकावून लावले.
गोरक्षणाचा सूड उगवल्याची चर्चा !श्री. प्रवीण कोळी हे राष्ट्रीय बजरंग दलाचे शहरप्रमुख आणि गोरक्षक आहेत. घटना घडण्याच्या ४-५ दिवस अगोदर त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह गोवंशियांची अवैध वाहतूक करणारी वाहने पकडली होती. त्याची बातमी सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली. याचाच सूड उगवला गेल्याचीच चर्चा होती. |
संपादकीय भूमिकाहिंदुत्वनिष्ठांविरुद्ध खोट्या तक्रारी करणार्या धर्मांधांवर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे ! तसे न करता हिंदुत्वनिष्ठांना अटक करणे, म्हणजे ‘चोर सोडून संन्याशाला फाशी देणे’, असा प्रकार होय ! ‘अफवा पसरवा आणि हिंदूंना अडकवा’, अशी नवी रणनीती धर्मांधांकडून राबवली जात असल्याचे दिसून येते. पोलीस अशांविरुद्ध कारवाई करतील का ? |