कोल्हापूर – जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या ३७५ व्या सदेह वैकुंठ गमनदिनी तुकाराम महाराज बीजनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. साकोली कॉर्नर येथील रामचंद्र यादव महाराज मठात ‘संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो…’ या संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर गुलालाचे कीर्तन झाले. ह.भ.प. शहाजी महाराज पाटील यांनी याविषयी मार्गदर्शन केले. या वेळी ह.भ.प. महादेव महाराज यादव, पुरुषोत्तम महाराज यादव, ज्ञानेश्वर महाराज यादव, जगन्नाथ महाराज पाटील, राजेंद्र वेल्हाळ यांसह अन्य उपस्थित होते.