इतिहासकारांनी राज्याला रस्ता दाखवावा ! – सुप्रिया सुळे, खासदार

औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीवर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

मध्यभागी सुप्रिया सुळे

पुणे – औरंगजेबाची कबर हटवण्यासंदर्भात इतिहासकारांनी अभ्यास करून राज्याला मार्गदर्शन करावे. योग्य काय ? अयोग्य काय ? हे इतिहासकार ठरवतील. खरा इतिहास समोर आला पाहिजे. प्रत्येकाची श्रद्धा वेगळी असते, त्यामुळे सरकारने सर्वांच्या श्रद्धेचा आदर करावा, असे मत शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. शरदचंद्र पवार पक्षाच्या पुणे शहर बैठकीपूर्वी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. (क्रौर्याने वागणार्‍या औरंगजेबाविषयी श्रद्धा बाळगणार्‍यांनी महाराष्ट्रात राहू नये, असेच जनतेला वाटते ! औरंगजेबाविषयीच्या जनतेच्या भावना जपाव्यात असे सांगणारे कोणत्या स्तराचे आहेत, हे लक्षात येते. जनतेने अशांना त्यांची जागा दाखवणे आवश्यक आहे ! – संपादक)