योगापासून कैद्यांना लाभ झाल्याचे ऑस्ट्रेलियन राष्ट्रीय विश्‍वविद्यालयाच्या संशोधनातून निष्पन्न

ऑस्ट्रेलियन राष्ट्रीय विश्‍वविद्यालयाच्या ३ संशोधकांनी केलेल्या अभ्यासात योग कार्यक्रमात सहभागी झालेल्या कैद्यांना विशेष लाभ झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

योगाभ्यास प्रतिदिनच हवा !

२१ जून या दिवशी आंतरराष्ट्रीय योगदिन पार पडला. गेली अनेक वर्षे योगऋषि रामदेवबाबा समाजातील प्रत्येक व्यक्तीने योगासने करावीत, यासाठी पुष्कळ मोठ्या प्रमाणामध्ये जागृती करत आहेत. ते समाजमनावर योगाभ्यासाचे लाभ आणि बिंबवत असलेले महत्त्व पाहून कोणालाही ‘योगाभ्यास करूया’, असेच वाटते.

योगा म्हणजे आत्मसाक्षात्काराचा अनुभव ! – श्रीमती वासंती लावंघरे, सनातन संस्था

योगाकडे केवळ एक व्यायामाचा प्रकार म्हणून पाहिले जाते; मात्र प्रत्यक्ष तसे नसून योगा हा व्यायामाच्याही फार पुढचा टप्पा आहे. योगा म्हणजे प्रत्यक्ष आत्मसाक्षात्काराचाच अनुभव आहे, असे गौरवोद्गार सनातन संस्थेच्या साधिका श्रीमती वासंती लावंघरे यांनी काढले.

काँग्रेसचे सध्याचे नेतृत्व योग करत नसल्याने काँग्रेसचा पराभव

काँग्रेसचे सध्याचे नेतृत्व योग करत नसल्याने काँग्रेसचा पराभव झाला, अशी टीका योगगुरु रामदेवबाबा यांनी केली.

योग करूनच लोक पंतप्रधान होतात ! – योगऋषि रामदेवबाबा

. . . यावर ‘राहुल गांधी पंतप्रधान होतील का?’ असे विचारले असता ते म्हणाले की, माझ्या बोलण्याचा अर्थ असा नसून मी केवळ योगाचे महत्त्व विषद करत आहे. – योगऋषि रामदेवबाबा

योगमुळे मनुष्य, समाज, देश आणि विश्‍व जोडण्याचे काम होत आहे ! – राष्ट्रपती

योग ही भारताने संपूर्ण जगाला दिलेली अमूल्य देणगी असून त्यामुळे मनुष्य, समाज, देश आणि विश्‍व जोडण्याचे काम होत आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काढले.

शाळेेत योगाच्या समावेशासाठी राज्यशासनाने पुढाकार घ्यावा ! – व्यंकय्या नायडू, उपराष्ट्रपती

सुदृढ निरोगी राष्ट्रासाठी योग करणे आवश्यक आहे. शालेय अभ्यासक्रमात योगाचा समावेश करण्यासाठी राज्यशासनाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केले.

भारतातील प्रत्येक विद्यापिठात आंतरविद्यापीठ योग सेंटर उभारण्याचा शासनाचा मानस ! – प्रकाश जावडेकर, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री

योग ही भारताची शक्ती असून जगाला दिलेली भेट आहे. भारतातील प्रत्येक विद्यापिठात आंतरविद्यापीठ योग सेंटर उभारण्याचा शासनाचा मानस आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.

ख्रिस्तीबहुल मिझोराममधील काँग्रेस सरकारकडून योगदिन साजरा नाही !

देशासह जगभरात २१ जूनला आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला असतांना ख्रिस्तीबहुल मिझोराम राज्यात काँग्रेस सरकारकडून योगदिन साजरा करण्यात आला नाही, असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.


Multi Language |Offline reading | PDF