शाळेचे फादर नोबित यांनी बूट घालून छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार घातला !

बडनेरा (जिल्हा अमरावती) येथील सेंट फ्रान्सिस शाळेतील प्रकार !

सेंट फ्रान्सिस शाळा

बडनेरा (जिल्हा अमरावती) – येथील नवीन बस्तीतील सेंट फ्रान्सिस शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी त्यांचा अवमान करण्यात आला. शाळेचे फादर नोबित यांनी बूट घालून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. शिवप्रेमी हिंदूंनी त्यांना त्वरित रोखण्याचा प्रयत्न केला; मात्र फादर नोबित यांनी उद्धटपणे ‘शाळा माझी आहे, माझ्या मर्जीप्रमाणेच शिवजयंती होईल. आय हेट मराठी (मी मराठीचा द्वेष करतो)’, असे सांगितले. (अशा उद्दाम फादरना शाळेतून काढायलाच हवे ! – संपादक) या प्रकरणी शिवप्रेमी आणि मराठी बांधव संतप्त आहेत.

‘छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून त्यांच्या जयंतीदिनी झालेल्या या अपमानाची आम्ही तीव्र शब्दांत निंदा करतो. फादर नोबित यांनी तातडीने जाहीर क्षमा मागावी’, अशी मागणी भाजपचे सचिव राजेश शर्मा यांनी केली आहे.

संपादकीय भूमिका

हा छत्रपती शिवाजी महाराजांचा उघडउघड अवमानच आहे ! अशांवर कठोर कारवाईच व्हायला हवी !