
छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील ‘छावा’ चित्रपटाने शंभूराजांविषयी जनसामान्यांमध्ये वीरश्री निर्माण केली आहे. बर्याच ठिकाणी शंभूराजांचा अतोनात छळ प्रेक्षक पाहू शकले नाहीत आणि चित्रपटगृहातून द्रवित मनस्थितीत प्रेक्षक बाहेर पडले. चित्रपटातून शंभूराजांच्या शौर्याने हिंदू भारित तर झाले आहेतच, त्यासह त्यांना अत्यंत क्रूरपणे अत्याचार करून मारणार्या औरंगजेबाबद्दल मनात आत्यंतिक घृणाही दाटली. औरंगजेब किती क्रूर धर्मांध होता, हे चित्रपटातून समाजाला काही अंशी पहाता आले. चित्रपटातून तेव्हाच्या प्रत्यक्ष परिस्थितीची कल्पना करता येईल. शंभूराजांनी मृत्यूला कवटाळले; परंतु धर्मपरिवर्तन केले नाही. आतापर्यंत केवळ महाराष्ट्रातील जनतेला ज्ञात असलेला हा इतिहास आता संपूर्ण देशभर पोचला आहे. त्यामुळे अन्यायाविरुद्ध चीड निर्माण झाली आहे. तेलंगाणातील भाग्यनगरचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांनी महाराष्ट्र सरकारकडे औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करण्याची मागणीही केली आहे.
महाराष्ट्रातील जनतेला शिवरायांचे गड-दुर्ग, रायगडाची महती, शिवनेरीचे महत्त्व, प्रतापगडाशी महाराजांनी दाखवलेले शौर्य, लालमहालात शाहिस्तेखानाची केलेली फजिती ज्ञात आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गल्लीत शिवजयंती गेली ३९५ वर्षे उत्साहाने साजरी होत आहे. शिवरायांनी आणि शंभूराजांनी केलेल्या पराक्रमाची स्थाने महाराष्ट्रातील प्रत्येकासाठी एक ऊर्जास्रोत आहे. त्यांच्या शौर्याचा इतिहास देश-विदेशात अभ्यासला जातो आणि विदेशीही त्यांच्या कर्तृत्वाने भारावून जातात. शिवरायांचे गड-दुर्ग, मावळ्यांची स्मृतीस्थळे, हिंदवी स्वराज्याची प्रत्येक खूण महाराष्ट्रातील प्रत्येक शिवप्रेमीसाठी आणि हिंदूसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. छत्रपती शिवरायांनी अफझलखानाचा कोथळा काढून त्याचा वध केल्यानंतरही ‘मरणान्ताणि वैराणी’ या हिंदु धर्मातील शिकवणीप्रमाणे शिवाजी महाराजांनी त्याच्या धर्माप्रमाणे यथासन्मान प्रतापगडाच्या पायथ्याशी त्याच्यावर अंतिम संस्कार करण्याचा आदेश दिला होता. याउलट औरंगजेबाने शंभूराजांनी इस्लाम स्वीकारावा, यासाठी त्यांचा आत्यंतिक छळ केला आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा देह अनेक भागांत छिन्न करून इंद्रायणीकाठी टाकून दिला. हिंदु राजा आणि इस्लामी क्रूरकर्मा यांच्यातील हा ठळक अन् स्पष्ट भेद आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर अनेक वर्षांनी औरंगजेब मरण पावला. त्याच्या इच्छेने त्याला पूर्वीच्या औरंगाबाद येथे दफन करण्यात आले. आजही या औरंगजेबाची कबर अत्यंत सुसज्ज स्वरूपात उभी आहे. आजूबाजूला योग्य सुशोभीकरणही आहे. दुसर्या बाजूला शिवरायांच्या गड-दुर्गांची स्थिती ढासळलेली, अस्वच्छ अशा स्थितीत आहे. शिवप्रेमींच्या प्रयत्नांनी या ठिकाणांची काही प्रमाणात निगराणी होत असली, तरी महाराष्ट्राचा जाज्वल्य ऐतिहासिक ठेवा आतापर्यंत दुर्लक्षितच राहिला होता.
एखाद्या समाजाच्या, प्रदेशाच्या अथवा देशाच्या इतिहासातून त्याचे भविष्य ठरत असते. शिवरायांच्या पाऊलखुणांमधून शिवप्रेमी हिंदू प्रेरणा घेतात आणि हिंदूसंघटनाचे कार्य करतात. ‘औरंगजेबाच्या कबरीचे काय ?’, ‘तिची सुसज्जता कुणाला कसले बळ पुरवत आहे का ?’, या प्रश्नांची उत्तरे कुणाकडे आहेत का ? छावा चित्रपट पाहिल्यानंतर देशभरातील अनेक धर्माभिमानी हिंदूंना आमदार टी. राजासिंह यांच्याप्रमाणे क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करण्याची मागणी करण्याचा विचार आलाच असेल. त्यामुळेच ‘छत्रपती संभाजी महाराजांचा छळ करणार्या, त्यांचे तुकडे करणार्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्राच्या भूमीत नसावी. औरंगजेबाचे नाव महाराष्ट्राच्या भूमीवरून पुसले गेले पाहिजे’, ही टी. राजासिंह यांची मागणी सर्वथा योग्य आहे.
बाबरी ढाचाच्या संदर्भातील मुसलमानांची धर्मांधता हिंदूंनी श्रीराममंदिर लढ्याच्या वेळी पाहिली आणि सोसलीही. आजही शिवजयंतीला अफझलखानवधाचे चित्र लावण्याला मोठा विरोध होतो. हिंदूंच्या सणावारी काढल्या जाणार्या मिरवणुकांवर आक्रमणे होतात, दंगलींद्वारे हिंदूंना लक्ष्य केले जाते, मंदिरांवर आक्रमणे होतात, या ना त्या कारणाने हिंदूंना सातत्याने दहशतीखाली ठेवण्याचा प्रयत्न धर्मांध मुसलमानांकडून होत असतो. धर्मांधतेची ही शिकवण कुठून मिळते, याचे उत्तर औरंगजेबाच्या कबरीतून मिळते. औरंगजेब, टिपू सुलतान, बाबर, महंमद घोरी अशा ज्या ज्या आक्रमकांनी अत्यंत मोठा कालावधी भारतातील हिंदूंचा छळ केला, त्यांच्या प्रतिकांतूनच ही धर्मांधता निर्माण होते, असे म्हणायला वाव आहेच. हिंदूंनी राममंदिरासाठी मोठा लढा देत त्यात यश मिळवले आहे. काशी-मथुरा येथील मंदिरांसाठीही हिंदू एकत्र लढा देत आहेत. हिंदूंच्या प्रार्थनास्थळांना पुन्हा मिळवण्यासह आक्रमकांची प्रतिके नष्ट करणे अत्यावश्यक आहे. गौरवशाली इतिहासाचे स्मरण करूनच उज्ज्वल भविष्य घडवता येऊ शकते. टी. राजा सिंह यांनी केलेल्या या स्वागतार्ह मागणीने यास आरंभ झाला पाहिजे, अशी राष्ट्रप्रेमी समाजाची भावना आहे.
नुकतेच हिमाचल प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील सुजानपूर येथील मशिदीसमोर महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याच्या स्थापनेला मुसलमान सुधारणा सभेने विरोध केला. ‘मशिदीसमोर महाराणा प्रताप यांचा पुतळा असेल, तर द्वेषाची भावना निर्माण होऊ शकते’, असे मुसलमान सुधारणा समाजाच्या सरचिटणिसाचे म्हणणे होते. मुळात महाराणा प्रताप यांच्यामुळे द्वेषाची भावना कशी निर्माण होऊ शकते ? ते राष्ट्रपुरुष होते आणि त्यांनी मोगलांशी लढा दिला. त्यातून प्रत्येक भारतियाने प्रेरणा घेणे आवश्यक असतांना मुसलमानांना असा विचार का येतो ? ते भारतीय आहेत कि मोगलांचे वंशज ? याची आता चर्चा झाली पाहिजे. अभिनेत्री स्वरा भास्कर हिनेही छावा चित्रपट आणि कुंभमेळा यांच्या पार्श्वभूमीवर ‘चेंगराचेंगरी होऊन लोकांचे भयावह मृत्यू झाले आहेत; पण ते सोडून चित्रपटातील ५०० वर्षांपूर्वीच्या घटना पाहून लोक भावूक होत असतील किंवा संताप व्यक्त करत असतील तर तो समाज मनाने आणि आत्म्याने मेलेला आहे’, असे औरंगजेबी फुत्कार काढले होते. हिंदूंनी आक्षेप घेतल्यावर आता स्वरा भास्करने तोंडदेखली क्षमा मागितली असली, तरी वैचारिक सुंता झालेल्या स्वरा भास्कर हिच्यात एवढी धर्मांधता कुठून आली ? त्यामुळेच धर्मांधतेला खतपाणी घालणारी आक्रमकांची प्रतिके भारतातून पूर्णपणे नष्ट झालीच पाहिजेत.
भारतात अनेक ठिकाणांना दिलेल्या आक्रमकांच्या नावांमध्ये आता पालट होत आहे; परंतु धर्मांधतेच्या वाढत्या गतीला थांबवण्यासाठी मोठ्या प्रमाणात आणि गतीने पालटाची प्रक्रिया घडणे अत्यावश्यक झाले आहे. प्रत्येक हिंदूने यासाठी संघटित व्हावे आणि जागोजागी असलेली आक्रमकांची प्रतिके नष्ट होण्यासाठी वैध मार्गाने अन् सरकारने त्यासाठी गतीशील प्रयत्न करायला हवेत !
वाढत्या धर्मांधतेला खतपाणी घालणारी आक्रमकांची प्रतिके भारतभरातून पुसण्यासाठी सरकारने गतीशील प्रयत्न करणे अत्यावश्यक ! |