सार्वजनिक आरोगमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती

मुंबई – कोरोना महामारीच्या काळात कुष्ठरोगाचे सर्वेक्षण करण्यात आलेले नाही. सर्वेक्षण केल्यास कुष्ठरोगाचे रुग्ण वाढतात. सर्वेक्षण केल्यावर कुष्ठरोगाचे रुग्ण वाढलेले आढळले. आणखी चांगल्या प्रकारे सर्वेक्षण केल्यास महाराष्ट्रातील कुष्ठरोगाचे रुग्ण वाढतील, असे वक्तव्य राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. काँग्रेसचे आमदार डॉ. नितीन राऊत यांनी १९ मार्च या दिवशी राज्यातील कुष्ठरोग निर्मूलनासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनेविषयीची विचारणा तारांकित प्रश्नाद्वारे केली.
देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात कुष्ठरोगींचे प्रमाण ०.६ टक्के आहे. कुष्ठरोगी रुग्णांना प्रतिमास देण्यात येणारे २ सहस्र रुपये इतके अनुदान ६ सहस्र रुपये करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. याविषयीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आला आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.