दादर रेल्वेस्थानकाबाहेरील हनुमान मंदिर तोडण्यासाठी रेल्वेकडून मंदिर विश्वस्तांना नोटीस !
दादर (पूर्व) रेल्वेस्थानकाच्या बाहेर असलेले श्री हनुमान मंदिर रेल्वेच्या जागेत असून ते अवैध असल्यामुळे तोडून टाकावे, अशी नोटीस मध्य रेल्वे प्रशासनाकडून मंदिराच्या विश्वस्तांना धाडण्यात आली आहे.