साधना तरुण वयातच करण्याचे महत्त्व !

‘म्हातारपण आल्यावर ‘म्हातारपण म्हणजे काय ?’, हे अनुभवता येते. ते अनुभवल्यावर ‘म्हातारपण देणारा पुनर्जन्म नको’, असे वाटायला लागते; पण तेव्हा साधना करून पुनर्जन्म टाळण्याची वेळ गेलेली असते. असे होऊ नये; म्हणून तरुण वयातच साधना करा.’

संपादकीय : जागरूक हिंदूंचा निर्णय !

जागरूक हिंदूंच्या कृतीला ‘कट्टरता’ ठरवणारे अन्य धर्मियांच्या ‘धार्मिकते’वर कधी आक्षेप घेतात का ?

भारतीय संस्कृतीचा ठेवा !

सूर्यनमस्कारासारख्या प्राचीन भारतीय योगप्रक्रियेविषयी जागरूकता निर्माण केल्यास लोकांना आरोग्यदायी आणि सकारात्मक जीवनशैलीचा मार्ग गवसेल, हे निश्चित ! सूर्यनमस्कार केवळ शारीरिक तंदुरुस्तीसाठीच नाही, तर मानसिक शांती, आत्मविश्वास आणि एकाग्रता वाढवण्यासाठीही उपयुक्त ठरतात.

मराठीवरील इंग्रजीच्या प्रभावाची पार्श्वभूमी

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर ‘आजची मराठी भाषेची दुःस्थिती’ आणि त्यावरील ‘कृतीशील उपाययोजना’ या दृष्टीने काही सूत्रे या मालिकेत आपण पुढे पहाणार आहोत.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी निर्माण केलेला वारसा जतन करणे आवश्यक !

आपण अहिल्याबाईंनी उभारलेली मंदिरे, विहिरी, कुंड, तलाव यांची देखभाल केली, तर एक शासक कसा असावा, हे येणार्‍या पिढीला शिकायला मिळेल. आम्ही हा इतिहास येणार्‍या पिढीला सांगितला नाही, तर आपली संस्कृती आपण गमावून बसू.

आपली प्रगती कशी अजमावावी ?

एका बाईने विचारले, ‘महाराज, मी पुष्कळ उपासना करते; पण परमार्थात आपली प्रगती किती झाली, हे कसे ओळखायचे ?’ त्यावर श्रीमहाराज म्हणाले, ‘दुधाच्या सायीत जेवढा आपला जीव अडकतो, तेवढा भगवंतामध्ये अडकायला लागला की, परमार्थात बरीच प्रगती झाली आहे समजावे.’

दुर्बलता हे दुष्कृत्यांचे मूळ !

सर्व दुष्कृत्यांच्या मागे असणारी प्रेरक शक्ती, म्हणजे ही दुर्बलताच होय. ही दुर्बलताच सार्‍या स्वार्थपरतेचे मूळ होय. या दुर्बलतेमुळेच माणूस दुसर्‍यांची हानी करतो आणि त्यांचे अनिष्ट करतो.