उपराष्‍ट्रपती जगदीप धनखड ३ डिसेंबर या दिवशी महाराष्‍ट्रात येणार !

केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्‍थेच्‍या शतकपूर्ती स्‍थापना दिन सोहळ्‍यास प्रमुख पाहुणे म्‍हणून उपराष्‍ट्रपती मुंबईमध्‍ये येणार आहेत.

१४ वर्षांच्‍या मुलीवर अत्‍याचार करणारा ५६ वर्षांचा आरोपी अटकेत !

अशा विकृतांना कारागृहातच डांबायला हवे !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्‍या रौप्‍यमहोत्‍सवी सोहळ्‍यातील वाचकांचे हृदयस्‍पर्शी मनोगत !

राजारामपुरी येथील इंद्रप्रस्‍थ सांस्‍कृतिक भवन येथे १ डिसेंबर या दिवशी पार पडलेल्‍या दैनिक ‘सनातन प्रभात’च्‍या रौप्‍यमहोत्‍सवी सोहळ्‍यासाठी ६०० हून अधिक वाचक, जिज्ञासू उपस्‍थित होते.

भारत सरकारने बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण करावे !

अशी मागणी का करावी लागते ?

बांगलादेशी रुग्‍णांनी भारताच्‍या राष्‍ट्रध्‍वजाला सलामी द्यावी, तरच उपचार होतील !

असे राष्‍ट्रप्रेमी डॉक्‍टर सर्वत्र हवेत !

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : रेल्‍वेच्‍या धडकेत एकाचा मृत्‍यू, दुसरा घायाळ;आकाशातून संयंत्रवजा उपकरण खाली पडले !…

नंदुरबार येथून जळगावला आलेल्‍या दोन मित्रांना धावत्‍या रेल्‍वेने धडक दिल्‍याने एकाचा जागीच मृत्‍यू झाला, तर दुसरा गंभीर घायाळ आहे.

फेंगल चक्रीवादळामुळे तमिळनाडूमध्‍ये भूस्‍खलन : ७ जण बेपत्ता

‘फेंगल’ चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्‍या तमिळनाडू राज्‍यातील तिरुवन्‍नमलाई येथील एका टेकडीवर भूस्‍खलन झाले.

WHF GenevaProtest Bangladeshi Minorities : बांगलादेशातील हिंदूंच्‍या रक्षणार्थ तेथे संयुक्‍त राष्‍ट्रांची शांती सेना पाठवा !

बांगलादेशातील हिंदूंवरील अनन्‍वित अत्‍याचारांच्‍या विरुद्ध जागतिक व्‍यासपिठावर प्रयत्न करणार्‍या ‘वर्ल्‍ड हिंदु फेडरेशन’चे अभिनंदन ! भारतातील बहुतांश हिंदू मात्र अशा वेळी निष्‍क्रीय रहातात, हे भारतासाठी लज्‍जास्‍पद !

कोल्‍हापूर जिल्‍ह्यातील साखर कारखान्‍यांनी ऊसदर तातडीने घोषित करावा !

या निवेदनात म्‍हटले आहे की, महाराष्‍ट्रातील साखर कारखान्‍यांचा गळीत हंगाम १५ नोव्‍हेंबरपासून चालू झाला आहे. त्‍यानुसार कोल्‍हापूर जिल्‍ह्यातील साखर कारखान्‍यांनी किमान मूल्‍यदराप्रमाणे ऊसदर निश्‍चित करून तो वर्तमानपत्राच्‍या माध्‍यमातून घोषित करणे आवश्‍यक आहे.

पुढील वर्षीच्‍या भाऊबीजेपासून ‘लाडक्‍या बहिणी’चे २ सहस्र १०० रुपये देण्‍याचा निर्णय घेऊ ! – सुधीर मुनगंटीवार, भाजपचे नेते

आम्‍ही गेल्‍या वर्षी भाऊबीजेच्‍या दिवशी ही योजना लागू केली होती. त्‍यामुळे आम्‍ही पुढील वर्षीच्‍या भाऊबीजेपासून ती रक्‍कम वाढवू शकतो, असे विधान भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. ‘द इंडियन एक्‍सप्रेस’ला दिलेल्‍या मुलाखतीच्‍या वेळी ते बोलत होते.