प्रतापगडाच्या पायथ्याशी उभारण्यात येणारे शिवछत्रपतींचे स्मारक भव्य असावे ! – डॉ. सुरेश चव्हाणके, सुदर्शन
प्रतापगडाच्या पायथ्याशी उभारण्यात येणारे शिवछत्रपतींचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण व्हावे, तसेच या ठिकाणी बसवण्यात येणारी मूर्ती ही गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मूर्तीहून मोठी असावी, असे मत ‘सुदर्शन’ वाहिनीचे मुख्य संपादक डॉ. सुरेश चव्हाणके यांनी व्यक्त केले.