नाशिक येथे पहिली राज्यस्तरीय मर्दानी युद्धकला आणि बोथटी चॅम्पियनशिप स्पर्धा उत्साहात पार पडली !

स्पर्धेत सहभागी झालेले स्पर्धक

नाशिक – स्वामी विवेकानंद जयंती आणि मा. जिजाऊसाहेब जयंती निमित्ताने १२ जानेवारीला पहिली राज्यस्तरीय मर्दानी युद्धकला आणि ‘बोथटी चॅम्पियनशिप २०२५’ स्पर्धा नाशिक येथे पार पडली. या स्पर्धेला राज्यातून विविध जिल्ह्यांतील खेळाडू खेळण्यासाठी आले होते. यामध्ये अहिल्यानगर, सातारा, नाशिक, येवला आदींचा सहभाग होता. मर्दानी युद्धकला ही अतीप्राचीन शिवछत्रपतींची परंपरा असून या युद्धकलेचा प्रचार होऊन युद्ध कलेला नवसंजीवनी मिळावी आणि मर्दानी युद्ध कलांचे संवर्धन व्हावे, यासाठी अशा स्पर्धा आवश्यक आहेत. सर्व युवकांनी मर्दानी युद्धकला शिकावी, यासाठी मर्दानी युद्धकला आणि बोथटी असोसिएशन ही संस्था प्रयत्न करत आहे. या स्पर्धेचा पहिला विजेता नाशिक जिल्हा, दुसरा सातारा आणि तिसरा अहिल्यानगर असा ठरला आहे.

या वेळी ‘औदुंबर भक्त मंडळ ट्रस्ट नाशिक’चे अध्यक्ष श्री. भूषणजी काळे, शिवसेनेचे श्री. अमेय जाधव, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष श्री. बापू ठाणगे आदी उपस्थित होते. शेवटी मर्दानी युद्धकला खेळाची थरारक प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.