कळंबोली (जिल्हा रायगड) – १२ जानेवारीला रोडपाली येथे अहमदनगर, बीड, पुणे अशा विविध ठिकाणांहून सर्वसामान्य शेतकर्यांनी भाजीपाला आणि फळे ‘शेतकरी ते थेट ग्राहक’अशा प्रकार विक्रीसाठी आणले होते. त्या वेळी पनवेल महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने शेतकर्यांना बाजार लावू दिला नाही. शेतमाल अतिक्रमण विभागाकडून जप्त करण्यात आला; मात्र धर्मवीर कामगार सेनेच्या सदस्यांनी मध्यस्थी करत शेतकर्यांची जप्ती थांबवली.
संबंधित शेतकरी म्हणाले, ‘‘शेतकरी वर्गाचा शेतमाल जप्त करतांना अतिक्रमण विभाग इतरत्र अवैधरित्या व्यवसाय करणारे खाटीक, जुगार, गुटखा, अन्नविक्रेते, बांधकाम व्यावसायिक यांच्यावर कारवाई करतांना का दिसत नाही ? त्यांच्याकडून हफ्तेखोरी केली जाते का ? या प्रकरणी पक्षपाती पनवेल महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या विरोधात आंदोलन करू.