India Introduced BHARGAVASTRA : भारताने ‘भार्गवास्त्र’ नावाने विकसित केली ड्रोनविरोधी प्रणाली !

भारताने विकसीत केलेली एक अत्याधुनिक सूक्ष्म-क्षेपणास्त्र तंत्रज्ञानावर आधारित ड्रोनविरोधी प्रणाली ‘भार्गवास्त्र !’

नवी देहली : महाभारतात उल्लेख केलेल्या ‘भार्गवास्त्रा’चे नाव महर्षी भार्गव परशुराम यांच्या नावावर ठेवण्यात आले होते. आता या नावापासून प्रेरणा घेऊन भारताने एक अत्याधुनिक सूक्ष्म-क्षेपणास्त्र तंत्रज्ञानावर आधारित ड्रोनविरोधी प्रणाली विकसित केली आहे.

महाभारतात उल्लेखलेले महर्षी भार्गव परशुराम यांचे भार्गवास्त्र !

ड्रोनविरोधी प्रणाली ‘सोलर ग्रुप’ आणि ‘इकॉनॉमिक एक्सप्लोसिव्हज लिमिटेड’ यांनी विकसित केली आहे. हे सूक्ष्म क्षेपणास्त्र तंत्रज्ञानावर आधारित आहे, जे शत्रूचे ड्रोन आणि मोठ्या संख्येने एकत्र उडणारे ड्रोन ओळखण्यास आणि नष्ट करण्यास सक्षम आहे. ही प्रणाली ६ किलोमीटर अंतरावरून लहान ड्रोनलाही ओळखू शकते आणि एकाच वेळी ६४ हून अधिक सूक्ष्म क्षेपणास्त्रे डागण्याची क्षमता आहे. त्याचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची अचूकता आणि अल्प खर्च. यामुळे ते मोठ्या प्रमाणात होणार्‍या ड्रोन आक्रमणांना तोंड देण्यासाठी प्रभावी ठरते. ही प्रणाली भ्रमणभाष तंत्रज्ञानावर आधारित आहे, जी कोणत्याही भूप्रदेशात अगदी ५ सहस्र मीटर उंचीवरही तैनात करण्यास सक्षम करते.

भारतीय ‘आयर्न डोम’च्या दिशेने पहिले पाऊल !

‘आयर्न डोम’ ही इस्रायलची प्रसिद्ध संरक्षण प्रणाली

अनेक संरक्षणतज्ञ या नवीन प्रणालीला भारताच्या ‘आयर्न डोम’च्या दिशेने एक मोठे पाऊल मानत आहेत. ‘आयर्न डोम’ ही इस्रायलची प्रसिद्ध संरक्षण प्रणाली आहे, जी क्षेपणास्त्रे आणि ड्रोन नष्ट करण्यास सक्षम आहे. भार्गवास्त्रही त्याच धर्तीवर स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित केले गेले आहे, जे भविष्यात देशाची सीमा सुरक्षा अभेद्य बनवण्याचे आश्‍वासन देते. इस्रायलचा ‘आयर्न डोम’ मालमत्तांचे संरक्षण करण्यात यशस्वी झाले आहे आणि भार्गवास्त्रालाही त्याच श्रेणीत पाहिले जात आहे.