अनुमती नाकारलेला महामेळावा घेण्‍याचा महाराष्‍ट्र एकीकरण समितीचा निर्धार !

कर्नाटक विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार, ९ डिसेंबरपासून बेळगाव येथे होत आहे. त्‍याच दिवशी महाराष्‍ट्र एकीकरण समितीच्‍या वतीने मराठी भाषिकांचा महामेळावा घेण्‍यात येणार. या मेळाव्‍यास प्रशासनाने अनुमती नाकारली आहे.

पुणे येथील वडाचीवाडी परिसरात १२ सहस्र लिटर गावठी मद्य जप्‍त !

कात्रज-कोंढवा बाह्यवळण मार्गावर वडाचीवाडी परिसरातील गावठी मद्य (दारू) सिद्ध करणार्‍या भट्टीवर काळेपडळ पोलिसांनी धाड टाकली. या प्रकरणी जगदीश प्रजापती आणि गुलाब रजपूत यांना अटक करण्‍यात आली आहे.

बीड येथील बनावट औषध साठा प्रकरणी भिवंडीतील आस्‍थापनाविरोधात गुन्‍हा नोंद !

जिल्‍ह्यातील अंबाजोगाई येथील स्‍वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्‍णालयात बनावट औषध साठा होत असल्‍याप्रकरणी गुन्‍हा नोंद केला आहे. हा साठा भिवंडी येथून पुरवला जात होता.

‘बॅलेट पेपर’वर (मतपत्रिकेवर) निवडणुका घ्‍या ! – खासदार सुप्रिया सुळे

अमेरिकेसह अनेक देशांमध्‍ये इ.व्‍ही.एम्.वर (इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्र) बंदी आहे. मी ४ वेळा इ.व्‍ही.एम्.द्वारे निवडून आले आहे. माझ्‍यासह समाजातही इ.व्‍ही.एम्.विषयी अस्‍वस्‍थता आहे. म्‍हणूनच इ.व्‍ही.एम्. ऐवजी ‘बॅलेट पेपर’वर निवडणुका घ्‍या, अशी मागणी होत आहे.

सनातन संस्‍थेचे संत पू. अनंत आठवले यांनी लघुग्रंथ प्रकाशन सोहळ्‍यात मनोगत व्‍यक्‍त करतांना सांगितलेले समर्थ रामदासस्‍वामी आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍यातील साम्‍य !

१८.२.२०२४ या दिवशी सनातन संस्‍थेचे १०१ वे संत पू. अनंत आठवले (पू. भाऊकाका) यांनी लिहिलेला ‘अध्‍यात्‍मशास्‍त्रातील विविध विषयांचा बोध’ हा लघुग्रंथ प्रकाशित झाला. या प्रकाशन सोहळ्‍यात पू. भाऊकाका यांनी व्‍यक्‍त केलेले मनोगत पुढे दिले आहे. 

केरी, फोंडा येथील श्री विजयादुर्गा देवस्थानात वस्त्रसंहिता (ड्रेस कोड) लागू

केरी, फोंडा येथील श्री विजयादुर्गा देवस्थानात वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ‘आपला पेहराव संस्कृतीला धरून असावा’ ही संकल्पना मंदिरात लागू करण्यात आली आहे.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी पुराव्याअभावी युवकाची निर्दाेष सुटका

मुरगाव तालुक्यात एका १७ वर्षीय मुलीवर वर्ष २०२२ मध्ये लैंगिक अत्याचार करून तिच्यावर मातृत्व लादण्यात आले होते. या प्रकरणी पणजी येथील जलद गती आणि पॉक्सो न्यायालयाने ३० वर्षीय संशयित युवकाची निर्दाेष सुटका केली. 

‘आनंददायी शनिवार’ उपक्रम शालेय विद्यार्थ्यांना ठरत आहे लाभदायी

या उपक्रमाच्या अंतर्गत मालवण तालुक्यातील कट्टा येथील वराडकर हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय या प्रशालेतील इयत्ता ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांनी ‘गावठी बाजारा’चे आयोजन केले होते. 

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्‍याचाराच्‍या निषेधार्थ पनवेल येथे सकल हिंदु समाजाच्‍या वतीने स्‍वाक्षरी मोहीम !

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्‍याचार आणि ‘इस्‍कॉन’चे प्रमुख चिन्‍मय कृष्‍णदास प्रभु यांना देशद्रोहाच्‍या आरोपाखाली अन्‍याय्‍य अटक करण्‍यात आली आहे.

श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानच्‍या वतीने ‘मातृपितृ इच्‍छापूर्ती’ दिवस (शिवप्रतापदिन) उत्‍साहात !

श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानच्‍या वतीने ‘मातृपितृ इच्‍छापूर्ती दिवस’ अर्थात् शिवप्रतापदिन उत्‍साहात साजरा करण्‍यात आला. या निमित्ताने प्रतिष्‍ठानच्‍या वतीने शिवतीर्थावर अफझलखानवधाचा भव्‍य फलक लावण्‍यात आला होता.