देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खाते कायम, एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास, गृहनिर्माण खाते !
महायुतीचे सरकार सत्तेवर येऊन १ महिना झाल्यानंतर २१ डिसेंबर या दिवशी महायुती सरकारचे खातेवाटप घोषित झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह मंत्रालयासह ऊर्जा, विधी आणि न्याय, सामान्य प्रशासन, तसेच माहिती आणि जनसंपर्क विभाग हे विभाग स्वतःकडे ठेवले आहेत.