भारत आणि अमेरिका यांच्यात ३०० कोटी डॉलर्सचा संरक्षण करार

भारताच्या दौर्‍यावर आलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २५ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. त्यांच्यात ३०० कोटी डॉलर्सचा संरक्षण करार झाला.

मलेशियाप्रमाणेे तुर्कस्तानवरही कारवाई करण्याची भारताची चेतावणी

पाकची तळी उचलणार्‍या तुर्कस्तानसारख्या इस्लामी राष्ट्रांवर कठोर कारवाई करून भारताने त्याला त्याची जागा दाखवणे आवश्यक आहे !

चीनच्या प्रयोगशाळेत कोरोना विषाणूंची निर्मिती झाल्याची चर्चा

कोरोना साथीविषयी चीन ज्या प्रकारे बर्‍याच गोष्टी लपवू पाहात आहे, त्यावरून या सूत्रात सत्यता आढळल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !

अमेरिका आणि तालिबान यांच्यात १ आठवड्याची युद्धबंदी

अमेरिका आणि तालिबान यांच्यात अफगाणिस्तानमध्ये पुढील एक आठवडा युद्धबंदी करण्यावर सहमती झाली आहे. अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटागॉनकडून ही माहिती देण्यात आल्याचे वृत्त पाकच्या प्रसारमाध्यमांनी प्रकाशित केले आहे.

भारताच्या अंतर्गत प्रकरणात नाक खुपसू नका ! – भारताची तुर्कस्थानला चेतावणी

जम्मू-काश्मीर भारताचे अविभाज्य अंग असून तो आमचा अंतर्गत विषय आहे. तुर्कस्थानचे राष्ट्रपती एर्दोगान यांची काश्मीरच्या संदर्भातील सर्व विधाने आम्ही फेटाळून लावतो. तुर्कस्थानच्या नेतृत्वाने आमच्या अंतर्गत विषयात हस्तक्षेप करू नये. सत्य काय आहे, ते नीट समजून घ्यावे.