अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या तरुणास २० वर्षांची सक्तमजुरी !

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या २१ वर्षीय बिसोवजित देबनाथ या तरुणाला २० वर्षे सक्तमजुरी आणि १५ सहस्र रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

उरण येथे ४ घरांमध्ये चोरी !

येथील वेश्वी गावातील ४ घरांमध्ये अज्ञात चोरांनी घरफोडी केली. चोरांनी बंद घरांच्या कड्या आणि खिडक्यांचे लॉक तोडून घरात प्रवेश केला. त्यांनी २५ लाख रुपयांचा ऐवज चोरला. त्यांची ही कृती सीसीटीव्ही कॅमेर्‍यात बंदिस्त झाली आहे.

परशुरामभूमीत अमृत सोहळा !

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांचा अमृतमहोत्सव आणि सनातन संस्थेचा रौप्यमहोत्सव हा संपूर्ण कार्यक्रम आध्यात्मिक स्तरावर पार पडला.

१० महिन्यांत १५ सहस्र प्रवाशांनी केला विनातिकीट प्रवास !

अशा फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाईच्या व्यतिरिक्त ठोस उपाययोजना करायला हवी, तरच विनातिकीट प्रवास करणार्‍यांची संख्या अल्प होईल !

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील संचालकांची वसुली लावा ! – सदाभाऊ खोत, आमदार

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शेतकर्‍यांऐवजी संचालकांच्या हितसंबंधितांना कर्ज देण्यात संचालक आणि अधिकारी यांनी धन्यता मानली आहे. आजपर्यंत त्यांना अनेकांनी पाठीशी घातले असून यापुढे त्यांच्याकडून वसुली केली जावी, तसेच बँकेवर प्रशासक नेमावा, अशी मागणी नवीन मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे

सांगली येथे मद्याच्या बाटलीसाठी उपाहारगृहातील नोकराचा खून !

एका मद्याच्या बाटलीसाठी उपाहारगृहातील एका नोकराचा खून करण्यात आला आहे. शैलेश राऊत (वय २६, रा. बेनीखुर्द, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी) असे मृताचे नाव आहे.

महाराष्ट्रात ‘झिका’ची एकूण रुग्णसंख्या १४० वर !

राज्यात ‘झिका’ची रुग्णसंख्या १४० वर पोचली असून त्यात सर्वाधिक १०९ रुग्ण पुणे येथे आहेत. राज्यातील एकूण रुग्णांपैकी ६३ गर्भवती आहेत. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. याचसह ताप रुग्णांच्या सर्वेक्षणावर भर दिला जात आहे.

अनधिकृत बांधकामासंबंधी पी.एम्.आर्.डी.ए.प्रशासन सक्रीय !

अनधिकृत बांधकामासंबंधी पी.एम्.आर्.डी.ए. प्रशासन सक्रीय झाले असून त्यांनी अनधिकृत बांधकाम करणार्‍यांवर गुन्हे नोंदवण्यास प्रारंभ केला आहे. आतापर्यंत १० सहस्र बांधकामांना त्यांनी नोटीस दिली आहे.

पनवेल येथे कळंबोली सर्कलच्या ठिकाणी सिग्नलविरहित इंटरचेंज होणार !

पनवेल येथील कळंबोली सर्कलच्या ठिकाणी सिग्नलविरहित इंटरचेंज उभारला जाणार आहे. येत्या ३ वर्षांत येथील वाहतूक कोंडी सुटण्याची शक्यता आहे. सिग्नलविरहित रस्त्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या मुंबई-पुणे महामार्गाच्या बरोबरीने २ टप्प्यांवर उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत.

मुंबई-नाशिक मार्गावर ‘एल्.एन्.जी.’ बसगाड्यांचा समावेश होणार !

‘एल्.एन्.जी.’ची किंमत डिझेलच्या तुलनेत अल्प असल्याने एस्.टी. बस प्रवासाचा प्रति किलोमीटर ऑपरेटिंग खर्च न्यून होणार आहे. ‘एल्.एन्.जी.’च्या एका टाकीत बस ७०० ते ७५० कि.मी. पर्यंत धावू शकते