पुणे येथील एका आस्थापनामध्ये देवतेच्या चित्राविषयी जागृती करून साधकांनी रोखले देवतेचे विडंबन !

श्री व्यंकटेश बालाजी आणि श्री साईबाबा यांचे चित्र असलेले पाकीट 
चित्र काढून टाकल्यानंतरचे पाकीट

पुणे – येथील सनातन संस्थेचे साधक श्री. निखील महाबळेश्वरकर हे श्री. व्यंकटेश कलाल यांच्या श्री साई बालाजी ट्रान्सपोर्ट या आस्थापनामध्ये काम करतात. ट्रान्सपोर्टचे देयक ज्या पाकिटातून येत होते, त्यावर श्री व्यंकटेश बालाजी आणि श्री साईबाबा यांचे चित्र होते. पाकिटाचा वापर संपल्यानंतर ते कचर्‍यात टाकले जाऊन त्याची विटंबना होत होती. याविषयी महाबळेश्वरकर आणि त्यांचे सहकारी श्री. तुषार नायर यांनी श्री. कलाल यांना रितसर माहिती दिली आणि त्यांचे प्रबोधन केले. प्रबोधनानंतर श्री. कलाल यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन मी ४ ते ५ महिन्यांत या पाकिटामध्ये पालट करतो आणि सध्या वापरात असलेल्या या चित्रांविषयी इतरांना काळजी घेण्यास सांगतो, असे आश्वासन दिले होते. या आश्वासनानुसार श्री. कलाल यांनी पाकिटामध्ये पालट केला आहे.

संपादकीय भूमिका

देवतांच्या चित्रांचे विडंबन होऊ नये, यासाठी प्रबोधन करणारे श्री. निखील महाबळेश्वरकर आणि प्रबोधनानंतर योग्य कृती करणारे श्री. व्यंकटेश कलाल यांचे अभिनंदन !