जत येथे भाजपचे आमदार पडळकर यांच्या सूचनेनंतर शेतकर्‍यांना त्वरित बसवून दिले जात आहेत ट्रान्सफॉर्मर !

तालुक्यातील येळवी खरात वस्ती येथील ट्रान्सफॉर्मर १ डिसेंबर या दिवशी दुपारी जळला होता. याविषयी शेतकर्‍यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना संदेश पाठवून ही माहिती दिली.

पुणे येथे ३ उच्चशिक्षित तरुणांना अमली पदार्थांची विक्री करतांना अटक !

आपल्याच वयाच्या तरुणांना अमली पदार्थांचे व्यसन लावणार्‍या उच्चशिक्षित तरुण गुन्हेगारांवर कडक कारवाई होणे अपेक्षित आहे !

स्पेलिंग न आल्याने शिक्षिकेकडून ७ वर्षांच्या मुलाला मारहाण !

अशा निर्दयी शिक्षकांना शाळेतून बडतर्फच करायला हवे ! मारहाण करणारे शिक्षक विद्यार्थ्यांवर कसे संस्कार करणार ?

‘कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली ! 

‘कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष प्रसाद निगुडकर यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

शिरूर (पुणे) येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने पुकारलेला बंद यशस्वी !

राममंदिराच्या आवारात चिकन-मटण मेजवानी होत असतांना एकाही हिंदूच्या ते लक्षात कसे आले नाही ?

पुणे येथे सैन्य अधिकार्‍याची ३७ लाख रुपयांची फसवणूक !

दुसरे सैन्य अधिकारी डी.एस्. पाटील यांच्यावर गुन्हा नोंद

मुंबईत भाजपची सत्ता असल्याने मारवाडीतच बोला ! – दुकानदाराची धमकी

सार्वजनिक स्तरावर मराठीची गळचेपी होण्याला मराठीभाषिकांना मराठीचा अभिमान नसणेच कारणीभूत आहे !

बिहार राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या संरक्षणासह आणि जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे !

‘दक्षिण भारत जैन सभे’ची बिहारचे राज्यपाल श्री. राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी !

बेळगाव जिल्ह्यातील रेणुकामाता मंदिर परिसरातील ‘जोगणभावी कुंडा’च्या दुरवस्थेसह भाविकांसमोर अनेक अडचणी !

मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम ! लाखो भाविक ज्यात स्नान करतात, ते कुंड जर वर्षानुवर्षे स्वच्छ होत नसेल आणि अन्य अडचणी सुटत नसतील, तर प्रशासनासाठी ते लज्जास्पद आहे !

बांगलादेशातील चिन्मय कृष्णदास प्रभु यांची अटक आणि हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकारने कार्यवाही करावी !

बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक हक्कांसाठी आवाज उठवणारे इस्कॉनचे चिन्मय कृष्णदास प्रभु यांना अनुचितरित्या देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.