माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे ९२ व्या वर्षी निधन !

भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे २६ डिसेंबरच्या रात्री १० च्या सुमारास निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. म्हातारपणामुळे त्यांना विविध शारीरिक त्रास होत होते. २६ डिसेंबरच्या सायंकाळी ते बेशुद्ध पडल्याने त्यांना देहलीच्या एम्स रुग्णालयात तातडीने हलवण्यात आले.

कामेरी (सातारा) येथील सैनिक शुभम घाडगे यांचा मृत्यू !

हुतात्मा शुभम यांचे प्राथमिक शिक्षण कामेरी येथे, तर माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण मिलिटरी अपशिंगे येथे झाले. शुभम यांच्या जाण्यामुळे कामेरी गावासह पंचक्रोशी आणि संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

गुरु पाठीशी असता कसलीच चिंता नाही ! – पंडित धीरेंद्र शास्त्री, बागेश्वर धाम सरकार

जळगाव जिल्ह्यातील झुरखेडा (ता. धरणगाव) येथे या ५ दिवसांच्या कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे. प्रथम दिवशीच सहस्रो भक्त कथा ऐकण्यासाठी येथे आलेले होते.

जुईनगर (नवी मुंबई) येथे अखंड हरिनाम सप्ताह

२८ डिसेंबर या दिवशी दुपारी ४ वाजता भव्य ग्रंथ दिंडी सोहळा होणार आहे. माजी नगरसेवक रंगनाथ औटी, संस्थेचे अध्यक्ष जालींदर औटी, सचिव मच्छिंद्र रोडे त्यांच्यासह अन्य पदाधिकार्‍यांनी हा सप्ताह साजरा करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

हिंदूंना आपल्या मुळांकडे परत जाणे आवश्यक आहे ! – मेजर जनरल डॉ. जी.डी. बक्षी (निवृत्त)

‘अहं ब्रह्मास्मि’ ही केवळ एक संकल्पना नाही, तर ती अनुभवली पाहिजे. आपल्याला आतापर्यंत चुकीचा इतिहास शिकवला गेला आहे.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘स्वामित्व योजने’चा शुभारंभ होणार !

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वामित्व’ योजना घोषित केली असून त्याद्वारे राज्यातील ३० जिल्ह्यांतील ३० सहस्र ५१५ गावांतील मालमत्ताधारकांना ‘डिजिटल प्रॉपर्टी कार्ड’ मिळणार आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायती स्वयंपूर्ण होण्यासाठी साहाय्य होईल.

Prayagraj Mahakumbha Parva 2025 : ‘डरेंगे तो मरेंगे’ हा फलक ठरत आहे चर्चेचा विषय !

नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे ।’ ही दिलेली घोषणा चांगलीच लोकप्रिय ठरली होती. त्याच आधारावर ‘डरेंगे तो मरेंगे ।’ ही घोषणा केल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

विसापूर (पुणे) येथे पोलिसाकडून ५ वर्षीय मुलीवर अतीप्रसंग !

छत्रपती शिवरायांच्या गड परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार होणे, हे महाराष्ट्राला लज्जास्पद !

पुणे येथे अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणार्‍या धर्मांधाला अटक

शाळेशी संबंधित सर्वच कर्मचार्‍यांच्या चारित्र्य प्रमाणपत्रांची पडताळणी वेळेवर करणे आवश्यक आहे !

सतीश वाघ यांच्या हत्येची सुपारी देणार्‍या त्यांच्या पत्नीला अटक !

सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणामध्ये यापूर्वी अतिश जाधव, पवन शर्मा, नवनाथ गुरसाळे, अक्षय जावळकर आणि विकास शिंदे यांना अटक केली आहे.