डोंबिवली येथे ३ बांगलादेशी महिला कह्यात !

बांगलादेशी घुसखोर

डोंबिवली – कायदेशीर कागदपत्रांविना घुसखोरी करून डोंबिवलीजवळील शिळफाटा रस्‍त्‍यावरील कोळेगावात बेकायदा वास्‍तव्‍य करणार्‍या ३ बांगलादेशी महिलांना उल्‍हासनगर गुन्‍हे शाखेच्‍या पथकाने अटक केली आहे. रोजीना सुकूल अली (वय २९ वर्षे), तंजिला खेतून रज्‍जाक शेख (वय २२ वर्षे), शेफाली बेगम शेख (वय २३ वर्षे) यांना अटक केली. त्‍या बांगलादेशातील अभयनगर उपजिल्‍ह्यातील खुलना विभागातील रहिवासी आहेत. त्‍यांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंदवण्‍यात आला आहे.

संपादकीय भूमिका :

बांगलादेशी घुसखोरांचा झालेला सुळसुळाट पहाता आपल्‍या शेजारी रहाणारे नागरिक बांगलादेशी तर नाहीत ना ? याकडे प्रत्‍येकाने गांभीर्याने पहायला हवे !