बेस्ट बसचालक संजय मोरे हाच अपघातासाठी उत्तरदायी !

  • सत्र न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण !

  • आरोपीचा जामीनअर्ज फेटाळला

मुंबई – गेल्या महिन्यात कुर्ला येथे ५० जणांना चिरडणारा बेस्ट बसचालक संजय मोरे हाच अपघातासाठी उत्तरदायी आहे. तो बस बेफिकीर आणि निष्काळजीपणे चालवत होता. गाडीत बिघाड झाला होता, हे मानता येणार नाही, असे निरीक्षण सत्र न्यायालयाने नोंदवत मोरे याचा जामीनअर्ज फेटाळला आहे. बसमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळेच बस अपघात झाला, हा आरोपी मोरेच्या अधिवक्त्यांचा दावा मान्य करण्यास न्यायालयाने स्पष्ट नकार दिला.